milk producer farmer 
सोलापूर

दूध उत्पादकांसाठी गूड न्यूज... 128 कोटीच्या अनुदानास मंजुरी 

तात्या लांडगे

सोलापूर : दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तत्कालीन युती सरकारने फेब्रुवारी ते मार्च 2019 दरम्यान प्रतिलीटर तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यानुसार राज्यातील 42 खासगी व सहकारी दूध प्रकल्पांनी 128 कोटी 67 लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव दुग्ध व्यवसाय विकास विभागाला सादर केला. मात्र, मागील वर्षभरात दूध उत्पादकांना न मिळालेल्या अनुदान वितरणास शासनाने मंजुरी दिली आहे. 

राज्यातील दुष्काळ, महापूर, अवकाळी, गारपीट यासह अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील पशुधन 30 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. बहूतांश जनावरे आजारी पडले असून चाऱ्यांचे दरही वाढू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेतीला पुरक व्यवसाय म्हणून ओळख असलेला दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे शासनाकडून वर्षांनंतरही दूध अनुदानाची रक्‍कम मिळत नसल्याने बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे. सोलापुरातील शिवप्रसाद दूध संघाचे सव्वाकोटी रुपयांचे अनुदान थकले आहेत. तर राज्यातील अन्य खासगी व सहकारी 41 प्रकल्पांमध्ये दूध घातलेल्या तीन लाख 86 लाख शेतकऱ्यांचे 127 कोटींचे अनुदान मिळालेले नाही. विशेषत: यातील बहूतांश दूध प्रकल्प सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, साताऱ्यातील आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशन, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अन्‌ निवडणुकांमुळे अनुदानास विलंब लागल्याचे राज्याच्या दूग्ध विकास विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आता शासनाकडून मंजुरी मिळाल्याने अनुदानाचे वितरण फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असे दूग्ध विकास विभागाने स्पष्ट केले. 


राज्याची स्थिती 
थकीत दूध अनुदान 
128.67 कोटी 
अनुदानाच्या प्रतीक्षेतील दूध प्रकल्प 
42 
दूध उत्पादक शेतकरी 
3.86 लाख 


फेब्रुवारीपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान 
फेब्रुवारी ते मार्च 2019 दरम्यान प्रतीलिटर तीन रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार राज्यातील 42 खासगी व सहकारी दूध प्रकल्पांच्या 128 कोटी 67 लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव शासनाला पाठविला. अनुदानाची रक्‍कम मंजूर झाली असून अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यात वितरीत करण्यात येईल. 
- शिवाजी शेळके, सहायक दूग्ध विकास अधिकारी, दूग्ध विभाग, पुणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Pune Accident: आत्याच्या लग्नाचा आनंद क्षणात विरला; आळंदीत दोन वर्षांच्या श्रुतिकाचा भीषण अपघातात मृत्यू, डॉक्टर चालक ताब्यात

Khed Crime: आधी घरफोडी... मग पुरणपोळीवर ताव! खेडमध्ये एका रात्रीत आठ घरांवर चोरट्यांचा डल्ला

ऐतिहासिक निर्णय! सातारा जिल्ह्यातील धोम धरणग्रस्त २९ गावांना मोठा दिलासा; पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी

SCROLL FOR NEXT