Water
Water esakal
सोलापूर

मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या दोन टीएमसी पाण्यास शासनाची मंजुरी

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

जलसंपदा विभागाच्या वतीने उजनी धरणातील पाणी वापराच्या फेर नियोजनाबद्दल आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवेढा (सोलापूर): पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर राजकीय सूड न काढता गेल्या तेरा वर्षापासून स्व. आ. भारत भालके यांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष सार्थकी लागला. उजनी प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेर नियोजन बैठकीत शासनाने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी 2 टीएमसी पाणी तरतूद केल्याचा आदेश काढत जलसंपदा मंत्र्यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द खरा केला आहे.

जलसंपदा विभागाच्या वतीने उजनी धरणातील पाणी वापराच्या फेर नियोजनाबद्दल आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सन 2021च्या सुधारित ताळेबंदासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प अहवालानुसार 2388.09 दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आल्याचा शासन निर्णय झाला. 2014 साली स्व. भालके यांच्या प्रयत्नातून जवळपास 560 कोटीच्या योजनेस प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे सरकारने ही योजना गुंडाळून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र स्व. आ. भालके यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत, या योजनेसाठी प्रयत्न सुरूच ठेवले.

2019 च्या तृतीय सुप्रमा अहवालानुसार मंगळवेढ्याच्या उपसा सिंचन योजनेसाठी 28.598 दलघमी इतके पाणी मंजूर होते. तालुक्यावर होणारा अन्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास स्व. आ. भालके यांनी आणून दिल्यानंतर याबाबत जलसंपदा मंत्र्याच्या दालनात या योजनेतील गावे व 2 टी.एम.सी.पाणी हे पूर्ववत ठेवण्याच्या अटीस मान्यता दिली. यावर बंदिस्त पाइपलाइनद्वारे 21 हजार 358 हेक्‍टरचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा कृष्णखोरे महामंडळाने उघडली व सर्वेक्षण सुरू झाले. पाणी वाटपाबाबत झालेल्या बैठकीत आता मंगळवेढ्याच्या योजनेसाठी 57.763 दलघमी पाणी मंजूर झाले. मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या आशा महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे आशा पल्लवित झाल्या असून येत्या काही दिवसात या योजनेच्या पूर्ततेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

स्व.भारतनानांचे अपूर्ण असलेले काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, मंत्री अशोक चव्हाण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करून या योजनेच्या पूर्ततेसाठी खा. शरद पवार साहेबांसह महाविकास आघाडीकडे सातत्याने प्रयत्न चालूच ठेवले.

- भगीरथ भालके, अध्यक्ष- विठ्ठल साखर कारखाना

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून वंचित गावांना पाणी देण्याबाबतचा शब्द जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सलगर बुद्रुक येथील पोटनिवडणुकीत प्रचार सभेत दिला. त्यांच्या शब्दाप्रमाणे 35 गावातील नागरिक राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहिले.

- पांडुरंग चौगुले- 35 गाव पाणी संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT