corona-positive-1585803595.jpg 
सोलापूर

टेस्टमध्ये ग्रामीणची आघाडी ! 17 हजारांहून अधिक व्यक्‍तींची टेस्ट; आज 'या' गावात सापडले 134 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये ऍन्टीजेन टेस्टवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत 17 हजार 619 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट झाली असून त्यामध्ये दोन हजार 275 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार 397 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 134 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आज दिला. समाधानाची बाब म्हणजे आज एकाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, शहरात आतापर्यंत 21 हजार 529 टेस्ट झाल्या असून अल्पावधीच जिल्ह्याने आघाडी घेतली असून आतापर्यंत 17 हजार 919 टेस्ट पूर्ण झाल्या आहेत. 


'या' गावांमध्ये सापडले नवे रुग्ण 
नातेपुते (माळशिरस) तीन, दक्षिण सोलापुरातील बोरामणी, धोत्री, होनमुर्गी, मनगोळी, नवीन विडी घरकूलात प्रत्येकी एक, कुंभारीत दोन, मंद्रूपमध्ये दहा, तर अक्‍कलकोटमधील एवन चौकात चार, देशमुख गल्लीत पाच, खासबाग, सुभाष गल्ली, वेताळ चौक, सुलेरजवळगे येथे प्रत्येकी एक, किनीत सहा, मैंदर्गीत पाच, माणिकपेठेत दोन रुग्ण आढळले आहेत. तसेच करमाळ्यातील मंगळवार पेठ व तहसिल कार्यालय येथे प्रत्येकी दोन, अळसुंदे येथे 11, वरकुटे येथे एक रुग्ण सापडला आहे. मंगळवेढ्यातील भिम नगर, पोलिस ठाण्याजवळ, दामाजी नगरात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच उत्तर सोलापुरातील नान्नजमध्ये 17 रुग्णांची भर पडली असून तिऱ्ह्यात एक रुग्ण सापडला आहे. माढ्यातील मिटकलवाडीत एक, मोहोळमधील बाजार तळ दोन, गुलशन नगर व माळी गल्लीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. 

ठळक बाबी... 

  • सोलापूर ग्रामीणमधील 17 हजार 619 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 11 तालुक्‍यांत आढळले एक हजार 397 पॉझिटिव्ह 
  • आज एकाचाही मृत्यू नाही; एकूण मृतांची संख्या 48 
  • बुधवारी (ता. 22) ग्रामीणमध्ये एक हजार 397 व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट 
  • आज 43 तर एकूण 662 रुग्णांनी केली कोरोनावर मात 


तालुकानिहाय रुग्णसंख्या 

  • अक्‍कलकोट : 401 
  • बार्शी : 519 
  • दक्षिण सोलापूर : 471 
  • पंढरपूर : 218 
  • उत्तर सोलापूर : 189 
  • मोहोळ : 173 
  • माळशिरस : 96 
  • माढा : 84 
  • मंगळवेढा : 57 
  • करमाळा : 44 
  • सांगोला : 23 
  • एकूण : 2,275 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, सख्ख्या भाच्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; महापालिकेच्या रिंगणात उतरणार

Nagpur Theft : नागपूरमध्ये डिलिव्हरी बॉयकडून महागडे पार्सल लंपास; २२.३४ लाखांचा अपहार; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

31st December Trip: लांब कुठं न जाता, मनोरीमध्ये 31 डिसेंबरचा परफेक्ट प्लॅन करा आणि निसर्गरम्य न्यू इअरचा अनुभव घ्या!

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

Kurpalच्या शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! बिबट्याला रोखण्यासाठी बियरच्या बाटल्यांचं अनोखं ‘जुगाड’ | Walva News | Sakal News

SCROLL FOR NEXT