cabs- 
सोलापूर

'तो' चालक सोलापुरातील गुरसाळेचा : कोरोनाच्या भितीने त्याचे कुटुंबिय निगराणीखाली 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मुंबई ते पुणे येथे दुबईवरून आलेल्या प्रवाशांना कोरोना हा विषाणू निश्‍चित झाला आहे. त्यांना मुंबईवरून आणणाऱ्या गाडी चालकासही कोरोना विषाणू झाल्याचे निश्‍चित झाले आहे. या गाडीचा चालक गुरसाळे (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने दहा वर्षापूर्वी गुरसाळे सोडल्यापासून 3 गाड्या विकत घेतल्या असून या कार कंपनीस करारावर दिल्या आहेत. कोरोना झाल्याचे निश्‍चित झाल्यामुळे शासनाने त्याच्या कुटुंबियांनाही निगराणीखाली हॉस्पिटल मध्ये ठेवले आहे. 


कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दोन टक्‍क्‍यांपर्यंतच आहे, जास्तीच्या तापमानात कोरोनाचा विषाणू टिकाव धरत नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी तथा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, गर्दी जमेल असे समारंभ करु नयेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. खोकला, सर्दीसह अन्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या व आजारी प्राण्यांच्या संपर्कात राहू नये, एक मिटर अंतरावरुन त्याच्याशी बोलावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जास्त तापमानात कोरोनाचा विषाणू जास्त प्रमाणात टिक नाही. मात्र, खोकला, सर्दी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या सहवासात नागरिकांनी राहू नये. सण-समारंभ साजरे करताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, कोरोनाचा उगम हा प्राण्यांपासून झाल्याने मांस खाताना पूर्णपणे शिजवलेले मांस खावावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 


सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात पाच बेड 
चीनमधील कोरोना हा विषाणूजन्य आजार आता पुण्यापर्यंत येवून ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आरोग्य विभागाच्या तातडीच्या दोन बैठक घेतल्या असून सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना निगराणीसाठी ठेवण्याचे निश्‍चित झाले आहे. तर श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाच बेडचा स्वतंत्र कक्ष उपचारासाठी तयार ठेवला आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासह पंढरपूर, अकलूज, बार्शीतील नामवंत हॉस्टिपलमधील बेडही राखीव ठेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


19 खासगी रुग्णालयांना दिले पत्र 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जावू नये, सार्वजनिक समारंभ साजरे करताना खबरदारी घ्यायला हवी. दरम्यान, कोरोनाचे महाराष्ट्रात रुग्ण आढळल्याने सोलापुरातील अकलूज, पंढरपूर, बार्शी येथील नामवंत 19 खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले असून त्याठिकाणी राखीव बेडची व्यवस्था केली जाणार आहे. सोलापुर शहरातील खासगी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाच बेडची व्यवस्था केली आहे. तसेच वाडिया हॉस्पिटलमध्ये बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना निगराणीखाली ठेवले जाणार आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातही उपचाराची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT