pandharpur machine satkar.jpg 
सोलापूर

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 'त्यांनी' दिले चार लाख रुपयांचे ऑक्‍सीजन मशीन 

भारत नागणे

पंढरपूर(सोलापूर) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील विधिज्ञ सारंग आराध्ये व त्यांच्या परिवाराने सुमारे चार लाख रुपये किंमतीचे हाय फ्लो नेसल ही अत्यावश्‍यक ऑक्‍सीजन मशीन पंढरपुरातील रुग्णांसाठी मोफत देणगी म्हणून दिले आहे. येथील अपेक्‍स हॉस्पिटलमध्ये ही मशीन रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या मशीनचा येथील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. 

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. महामारीमध्ये अधिकाधिक लोकांचे प्राण वाचावेत यासाठी प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. रुग्णांसाठी शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे उपलब्ध करुन दिली आहेत. तरीही पंढरपुरातील अनेक रुग्णालयात अत्याधुनिक साधने आणि उपकरणांचा अभाव असल्याने रुग्णांना उपचारासाठी इतत्र जावे लागते. रुग्णांची ही गरज ओळखून येथील विधिज्ञ सारंग आराध्ये व त्यांच्या परिवाराकडून हॉय फ्लो ऑक्‍सीजन मशीन स्वखर्चातून येथील अपेक्‍स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. या अत्याधुनिक ऑक्‍सीजन मशीनमुळे रुग्णांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे. सुमारे चार लाख रुपये किमतीची ही मशीन कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरणारी आहे. 

येथील सारंग आराध्ये हे मुंबई उच्च न्यायालयात वकीली करतात. त्यांचे पंढरपूरशी असलेले घट्ट नाते या निमित्ताने अधोरेखीत झाले आहे. त्यांनी सामाजिक भावनेतून ही अत्याधुनिक ऑक्‍सीजन मशीन पंढरपूरकरांसाठी भेट दिली आहे. आज प्रांताधिकारी सचिन ढोले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, डॉ.अरिफ बोहरी, डॉ. प्रविदत्त वांगीकर, डॉ.अभिजित माचणूरकर, डॉ.संदीप गवळी, डॉ.मंदार सोनवणे, डॉ.करण व्होरा यांच्या उपस्थितीत ही मशीन अपेक्‍स हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्त केली. पंढरपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्‍सीजन मिळावा आणि त्यातून त्यांचे जीव वाचावेत. या यंत्रणेनमुळे रुग्णाला प्रति सेंकदाला 60 लीटर ऑक्‍सीजन मिळणार आहे. कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी या यंत्रणेची मदत होणार असल्याचे सतीश आराध्ये यांनी सांगितले. 
 
संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT