He has been friends with crows for 25 years.jpg 
सोलापूर

त्यांनी जपली 25 वर्षांपासून कावळ्यांशी मैत्री 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : कोरोना असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे. संचारबंदी लागू असल्याने नागरिक घरात नजरकैद आहेत. त्यामुळे पशुपक्षी रस्त्यावर आणि नागरिक घरात असे निदर्शनास येते. नागरिकांचे घराबाहेर जाणे बंद असल्याने अनेक पशुपक्ष्यांची अन्नपाण्याविना उपासमार होत आहे. या टाळेबंदी काळात विठ्ठल भोसले कावळ्यांची सेवा करत आहेत. 

सामान्यत: कावळा माणसांशी मैत्री करत नाही. तथापी, दीर्घकाळ त्याला कोणी दाणे दिल्यास त्यांची भावनिक गट्टी जमते. सोलापुरात किराणा दुकानदार आणि कावळ्यात अशीच 25 वर्षांपासूनची मैत्री पाहण्यात येते. मुक्‍या पक्ष्यांना खायला-प्यायला देणे हे पुण्य समजत असल्याने श्री. भोसले कावळ्यांना रोज दाणापाणी घालतात. 

शहरालगत असलेल्या तळेहिप्परगा येथील मशरूम गणपतीसमोर विठ्ठल भोसले यांचे किराणा दुकान आहे. मागील 25 वर्षांपासून ते किराणा दुकान चालवून आपली उपजीविका चालवतात. त्यांच्याच दुकानांसमोर रोज कावळ्यांची शाळा भरते. रोज सकाळी साडेसहा वाजता कावळ्यांचे थवेच्या थवे दाणापाण्यासाठी तिथे येतात. हे सत्र 25 वर्षांपासून सुरू आहे. श्री. भोसले हे रोज कावळ्यांच्या थव्यांना दाणापाणी खाण्यास देतात. दुकान उघडण्यासाठी ते सकाळी सहा वाजता येतात. ते येण्यापूर्वीच कावळे त्यांच्या दुकानासमोर एका रांगेत बसलेले असतात. भोसले दिसताच कावळे जोरजोराने काव काव करून ओरडतात. त्यानंतर भोसले हे आपल्या दुकानातील फरसाणा, बटर, समोसा, तांदूळ तसेच कावळ्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ त्यांना खाऊ घालतात. येथे सुमारे 200 कावळ्यांचा थवा जमतो. दिलेला खाऊ आपल्या चोंचीत पकडून कावळे उडून जातात. 

कावळ्यांना खाऊ-पिऊ घातल्याने आपल्याला कधीच कमी पडणार नाही. "ही माझी पुण्याई' या भावनेने भोसले कावळ्यांना खाऊपिऊ घालतो. ते कावळ्यांची निस्वार्थ भावनेने मागील 25 वर्षांपासून कसलाही गाजावाज न करता अखंड सेवा करतात. कावळ्याला अन्नदान करतानाचे पाहून मॉर्निंग वॉकला येणारे नागरिक भोसले यांचे कौतुक करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Red Alert: नाशिकला रेड अलर्ट; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंगी गड व नांदुरी घाट मार्ग ७ ते ९ जुलैपर्यंत भाविकांसाठी बंद

Junnar Rains : जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने धरणसाठा वाढला; अलदरेतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Pune Mula-Mutha flood : मुळा-मुठा नदीला पूर; कोरेगाव मुळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

India T20I Squad: भारताचा T20I संघ जाहीर! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला डच्चू, तर रिंकू सिंगचे पुनरागमन

Raigad Flood : रायगडमध्ये मुसळधार पावसाने कहर; सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्या धोक्यापलीकडे, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT