Pandharpur Wari esakal
सोलापूर

वारकऱ्यांसाठी खुषखबर! आरोग्यमंत्री म्हणाले, कार्तिकी वारीला परवानगी

वारकऱ्यांसाठी खुषखबर! आरोग्यमंत्री म्हणाले, कार्तिकी वारीला परवानगी

तात्या लांडगे

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी वारी (भागवत एकादशी) 15 नोव्हेंबरला होत आहे.

सोलापूर : कोरोनाचे (Covid-19) निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी वारी (भागवत एकादशी) (Kartiki Waari) 15 नोव्हेंबरला होत आहे. त्यावेळी पंढरीत (Pandharpur) भाविकांची मोठी गर्दी होईल म्हणून जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे (Department of Public Health) परवानगीचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वारीसाठी आता स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले.

आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या प्रमुख चार वारींच्या निमित्ताने दरवर्षी पाच ते दहा लाखांपर्यंत भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होतात. मात्र, राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे 17 एप्रिल 2020 पासून श्री विठ्ठलाची एकही वारी भाविकांच्या उपस्थितीत होऊ शकली नाही. कोरोनाच्या दोन्ही लाटेत आषाढी वारीच्या निमित्ताने मानाच्या पालख्या एसटी महामंडळाच्या मदतीने बसमधून पंढरीत दाखल झाल्या. दरम्यान, आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. दुसरीकडे कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण मोहीम जोमात सुरू आहे. सात कोटींहून अधिक व्यक्‍तींनी लस टोचली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 100 टक्‍के व्यक्‍तींचा पहिला डोस पूर्ण करण्याचे नियोजन केले जात आहे. दरम्यान, 18 वर्षांवरील सर्वांनीच प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले. दरवर्षीप्रमाणे वारी करण्यास राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रत्येकाला लस टोचली जात असून, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या यंदाच्या कार्तिकी वारीसाठी स्वतंत्र परवानगीची गरज लागणार नाही. वारकऱ्यांच्या उपस्थितीत वारी होईल.

- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

सर्वांनाच रांगेतून पांडुरंगाचे दर्शन

कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आल्यानंतर मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सुरवातीला दर्शनासाठी भाविकांची मर्यादा घालण्यात आली होती. परंतु, आता ते निर्बंध उठविले असून दररोज येईल त्याला रांगेतून श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करणे सर्व भाविकांसाठी क्रमप्राप्त आहे. दरम्यान, वारीसाठी परवानगी देताना सर्वांनीच प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असा निकष लावला जाण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT