सोलापूर : भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार तहसीलदारांनी ही फिर्याद दिली होती.
हेही नक्की वाचा : खासदारांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात 13 मार्चला सुनावणी
जात पडताळणी समितीने खासदार डॉ. महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना जोडलेले जात प्रमाणपत्र रद्द ठरवले. या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी याचिका डॉ. महास्वामी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयात 13 मार्चला सुनावणी होणार आहे. तर प्रतिवादी प्रमोद गायकवाड यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या इलेक्शन पिटिशनवर 20 मार्चला सुनावणी होणार आहे. दरम्यान, सोमवारी (ता. 2) उच्च न्यायालयाने तहसीलदारांनी फिर्याद दिली नसल्यास काहीच कार्यवाही करू नये आणि दाखल केली असल्यास सोलापूर न्यायालयाने योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार आता तहसीलदारांच्या फिर्यादीवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही नक्की वाचा : एक लाख कोटींची गरज ! सिंचन प्रकल्प निधीअभावी कोरडेच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.