nagnath kshirsagar 
सोलापूर

नागनाथ क्षीरसागर यांच्या विरोधातील तक्रारीवर 24 डिसेंबरला सुनावणी 

प्रमोद बोडके

सोलापूर : मोहोळचे (जि. सोलापूर) शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल दाखल झालेल्या तक्रारीवर आज सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती समोर सुनावणी झाली. मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी यापूर्वीच दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता पेनुरचे (ता. मोहोळ) जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांनी देखील तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही तक्रारींची सुनावणी आता एकत्रितपणे चालविली जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुळे यांनी दिली. 

आज सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील सामाजिक न्याय भवनातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती समोर सुनावणी झाली. क्षीरसागर यांच्या विरोधात हनुमंत माने यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर क्षीरसागर यांनी वकिलाच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे समितीसमोर मांडले होते. माने यांना माझ्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा क्षीरसागर यांनी यापूर्वीच्या सुनावणीत उपस्थित केला होता. हनुमंत माने यांना क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार आहे की नाही? याचा निर्णय 24 डिसेंबरच्या सुनावणीत घेतला जाणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष सूळ यांनी दिली. 

जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची प्रत आज नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांना देण्यात आली. सोनवणे यांच्या तक्रारीवर क्षीरसागर आता त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ, समितीच्या सदस्य सचिव छाया गाडेकर आणि सदस्य संतोष जाधव यांच्यासमोर आज ही सुनावणी झाली. सुनावणीसाठी नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर, तक्रारदार व जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे, तक्रारदार व आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने उपस्थित होते. तक्रारदारांच्यावतीने ऍड. नितीन हबीब यांनी काम पाहिले. क्षीरसागर यांच्यावतीने ऍड. अमरिश खोले यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold rate Today : सोनं-चांदी पुन्हा जैसे थे! दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज उसळी; सर्वसामान्यांची निराशा, जाणून घ्या आजचे भाव

MLA Amit Deshmukh : लातूरनं सांगितलंय... ‘हात म्हणतंय लातूर’; आमदार अमित देशमुख ः लातूरकरच या विजयाचे खरे शिल्पकार

BJP Falls : दिग्गज आले, सत्ता आली; पण बहुमत हुकले! सांगलीत भाजपचा वारू काठावरच थांबला

Malegaon Municipal Election Results : मालेगावात दादा भुसे ठरले किंगमेकर! शिवसेना-इस्लाम पक्षाची दमदार मुसंडी, BJP-MIM ची काय स्थिती?

Latur Municipal Election Result : लातूर म्हणतंय काँग्रेस... काँग्रेस... काँग्रेस...

SCROLL FOR NEXT