Help from Maharashtra Navnirman Sena to release Corona patient at home in Solapur 
सोलापूर

अडचणीतल्या रुग्णाला घरी सोडून मनसेचे राज ठाकरेंना अनोखे बर्थडे गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा

करकंब (सोलापूर) : 'कोरोना रुग्णास बिलासाठी ठेवले डांबून' हे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी कुंभारी येथील आश्विनी रुगणालयास याबाबत विचारणा केली असता, त्यांनी चक्क आम्ही रुग्णास डिस्चार्ज देवून सुद्धा त्यांचेच नातेवाईक नेण्यास आले नसल्याचे अजब उत्तर दिले. त्यानंतर रुग्णालयाच्या दुटप्पी भूमिकेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट रुग्णालयात जाऊन रुग्णाची मुक्तता केली.
बार्डी (ता.पंढरपूर) येथील एक रुग्ण १ जूनला केरोनाग्रस्त आढळून आल्यानंतर त्यांना करकंब ग्रामीण रुग्णालयामार्फत सोलापूर येथे पाठविण्यात आले होते. तेथून त्यांना कुंभारी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल ते बाधित नसल्याचा आला. यावेळी रुग्णालयाने सदर रुग्णास घरी सोडणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे न करता उलट रुग्णाच्या कुटुंबियांकडे उपचारासाठी ३२ हजार ८०० रुपये भरण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर मनसेचे राज्य सरचटणिस दिलीप धोत्रे यांनी शनिवारी (ता. १३) सर्व संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देवून शासकीय नियमाप्रमाणे कोणतेही बील न आकारता रुग्णास ताबडतोब घरी सोडण्याची विनंती केली होती. याबाबत आज 'सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खुद्द जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीच रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णास ताबडतोब घरी सोडण्याची सुचना करत घडल्या प्रकाराबाबत जाब विचारला. तेव्हा रुग्णालयाकडून रुग्णास डिस्चार्ज दिलेला असतानाही त्यांचे नातेवाईकच त्यांना नेण्यासाठी आले नसल्याचे अजब उत्तर दिले. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वास्तविक पाहता कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर त्यांस दवाखान्यात घेवून जाण्यापासून उपचार करुन परत घरी पोहोच करेपर्यंतचे सर्व सोपस्कार शासकीय खर्चातूनच केले जातात. असे असताना रुग्ण बरा झाल्यावर त्याला घरी पोहचविणे ही संबंधित रुग्णालयाची जाबाबदारी असताना ती पार न पाडता उलट नातेवाईकांकडे प्रथम भरमसाठ पैशाची मागणी करायची आणि नंतर घुमजाव करण्याचा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्राकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनिद्दीन शेख, उपजिल्हा अध्यक्स अमर कुलकर्णी, राहुल अक्कलवडे यांनी रुग्णालयात जाऊन विनामोबदला रुग्णाचा डिस्चार्ज घेतला. यावबत रुग्णालयाच्या डॉ.माधवी रायते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

गोरगरिबांकडून नियमबाह्य पैसे
मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे म्हणाले, कुंभारी येथील आश्विनी रुग्णालयाने बार्डी येथील कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर तब्बल ३२ हजार ८०० रुपयांची मागणी करत चार दिवस डांबून ठेवले. याबाबत स्वतः सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना बोलून शनिवारीच माहिती दिली होती. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी आश्विनी रुग्णालयास संपर्कही साधला होता. त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांनी सदर रुग्णालयास संपर्क साधला असता त्यांनी खोटे बोलून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला. पण सध्या कोरोनामुळे सर्वत्र आणीबाणीची परिस्थिती असताना गोरगरिबांकडून नियमबाह्य पैसे उकळणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णास एकही पैसा न भरता डिस्चार्ज देऊन आज राज ठाकरे यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Latest Marathi News Live Update : जकार्तामधील मशिदीत स्फोट; 50 हुन अधिकजण जखमी

Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT