1seniorcitizens_20fb_0.jpg 
सोलापूर

धक्‍कादायक ब्रेकिंग ! दिव्यांग अन्‌ ज्येष्ठ नागरिकांसाठीची हेल्पलाईनच निराधार 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांनाच असल्याने त्यांना घरपोच सेवा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समाजकल्याण विभागातर्फे स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक देऊन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन कागदोपत्री केले. मात्र, धान्य अथवा किरणा मालासाठी शेजारील व्यक्‍तीला घेऊन जा, दुकाने बंद झाल्यानंतर कॉल करा, असे सल्ले दिले जात असल्याचा अनुभव शुक्रवारी (ता. 17) सकाळने घेतला. 

सोलापूर शहर-जिल्ह्यात किती निराधार दिव्यांग व एकाकी ज्येष्ठ नागरिक आहेत अथवा एकूण दिव्यांग तथा ज्येष्ठ नागरिकांची अपडेट संख्या समाजकल्याण विभागाकडे नसल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्‍त कैलास आढे यांनी सांगितले. मात्र, हेल्पलाईनवर संपर्क केलेल्या प्रत्येक निराधार व्यक्‍तीला घरपोच सेवा दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आश्रम शाळांमधील 75 तर दिव्यांगांच्या शाळांमधील 20 मुख्याध्यापकांची नियुक्‍ती करण्यात आल्याचेही ते म्हणाले. ज्यांना उत्पन्नाचा काही स्त्रोत नाही, निराधार, एकाकी आहेत त्यांनाच घरपोच सेवा दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तर बहूतांश निराधारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मोफत धान्यही दिले जात आहे. मात्र, कुर्डूवाडीतून एकाच दिव्यांग व्यक्‍तीचा कॉल आल्याचे तेथील नियुक्‍त कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले तर काही मुख्याध्यापकांनी संपर्क करुनही उत्तर दिले नाही. संपर्क करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने निराधार घराबाहेर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

आतापर्यंत 370 व्यक्‍तींना घरपोच सेवा 
सोलापूर शहर-जिल्ह्यातील एकाकी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची लॉकडाउन काळात सोय व्हावी यासाठी समाजकल्याणचे सहायक आयुक्‍त कैलास आढे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. गरजूंपर्यंत सेवा पोहचावी या हेतूने 95 मुख्याध्यापकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाने 0217- 2734950 हा हेल्पलाइन क्रमांक दिला असून प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी व शहरासाठी स्वतंत्र मुख्याध्यापकांची नियुक्‍ती केली आहे. आतापर्यंत 95 दिव्यांग तर 275 ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा दिल्याची माहिती सहायक आयुक्‍त कैलास आढे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस 'वन मॅन आर्मी'... मुंबईसह महाराष्ट्र कसा जिंकला? पक्षातील अन् बाहेरील विरोधकांना शिकवला धडा!

Health Insurance : केंद्र सरकारचा 'परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा’ सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नेमका काय फायदा?

गुज्जूभाई...! पहिल्याच षटकात सलग दोन विकेट्स; पाकिस्तानी आडवा आला, नाहीतर भारतीय वंशाच्या गोलंदाजाची होती हॅटट्रिक

BMC Election Result: २९ महापालिका २८६९ उमेदवार; १४ ठिकाणी भाजप मोठा पक्ष, राज्यात कुठे कसा लागला निकाल?

Phone Scrolling : सतत फोन स्क्रोलिंगने मेंदू थकतोय? जाणून घ्या 'हे' 4 कारण, नाहीतर एकाग्रता अन् मानसिक आरोग्य येईल धोक्यात

SCROLL FOR NEXT