मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) : 1972 च्या दुष्काळात बांधलेला बार्शी तालुक्यातील हिंगणी मध्यम प्रकल्प मानवाच्या हव्यासामुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक बनत आहे. धरणाच्या आतील बाजूस भरावलगत होत असलेला बेसुमार गाळ उपसा, संपूर्ण भराव क्षेत्रावर वाढलेले वृक्ष व वेली, कालव्याला पडलेले तडे, कोसळलेले भरावाचे कठडे यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होण्याची भिती व्यक्त होत आहे.
हिंगणी मध्यम प्रकल्प हा हिंगणी, वैराग, पिंपरी, साकत, उपळे, मळेगाव, जामगाव, नांदनी, लाडोळे, काळेगाव, मानेगाव, घाणेगाव, तडवळे, इर्ले, इर्लेवाडी आशा विविध गावासाठी वरदायनी ठरला आहे. प्रकल्पामुळे धरण क्षेत्रातील व कालवा क्षेत्रातील हजारो एकर क्षेत्र बागायती होऊन परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. मात्र लॉकडाउनच्या काळातदेखील मानवाची स्वार्थीवृत्ती व जीवघेणी स्पर्धा धरणासाठी धोकादायक ठरतेय. धरणाच्या आतील बाजूस सुरक्षिततेच्या दृष्टीने दगड व माती टाकून मजबूत पिचिंग केली जाते. मात्र काळी कसदार माती भेटते म्हणून भरावाच्या लगत पिचिंग क्षेत्राला मानवी घूस लागल्याने मोठे खड्डे पडून धोका निर्माण झाला आहे. "ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये" ही म्हण प्रचलित आहे. त्यानुसार काही मानवी वृत्ती गाळ उपसा करताना धरणालाच इजा पोहचवण्याच काम करत आहेत आणि प्रशासनही त्याकडे डोळेझाक करीत आहे. गतवर्षी "हिंगणी धरणाची झालेली दुरावस्था" सकाळच्या अंकातून सविस्तर बातमी प्रकाशित करून प्रशासनाला जाग करण्याच काम करण्यात आले होते. मात्र तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले. भरावच्या संपूर्ण क्षेत्रावर मोठमोठे वृक्ष वाढले आहेत. वृक्षांच्या खोलवर रुजलेल्या मुळ्यामुळे देखील धरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वेळीच खबरदारी घेत धरणाची सुरक्षितता राखली नाही तर भविष्यात तिवरे धरण व पानशेतची पुनरावृत्ती होऊन मोठा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.