home loan interest rate national cooperative bank schemes Sakal
सोलापूर

Home Loan : गृहकर्जांमध्ये आकर्षक व्याजदराची स्पर्धा; राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बॅंकांच्या विविध योजना

आकर्षक व्याजदर, प्रोसेसिंग शुल्कातील सवलती, प्लॉट खरेदीवर कर्ज आदी अनेक योजनांमुळे अगदी ७५५ रुपये प्रती लाख रुपयापासून कर्ज योजना उपलब्ध झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : गृह बांधणीच्या कर्ज व्याजदराच्या चढाओढीने कर्जदार ग्राहकांना त्याचा चांगलाच लाभ होऊ लागला आहे. आकर्षक व्याजदर, प्रोसेसिंग शुल्कातील सवलती, प्लॉट खरेदीवर कर्ज आदी अनेक योजनांमुळे अगदी ७५५ रुपये प्रती लाख रुपयापासून कर्ज योजना उपलब्ध झाल्या आहेत.

शहरातील अनेक राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बॅंकांनी आकर्षक गृह कर्ज योजना बाजारात आणल्या आहेत. या योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर आकारला गेल्याने मासिक कर्ज हफ्ता ७५५ रुपये ते ८५० रुपये प्रति लाख दराने उपलब्ध केला गेला आहे.

काही बॅंकांनी प्रोसेसिंग शुल्क माफीची घोषणा केली आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांनी कमीत व्याजदराच्या व ईएमआयच्या घोषणा करत स्पर्धेत आघाडी घेतली आहे. त्यासोबत खासगी वित्तीय संस्थांनी देखील आक्रमकपणे प्लॅन दिले आहेत.

टेकओव्हर व टॉप अप लोन

बॅंक ऑफ इंडियाने स्टार गृह कर्ज योजनेत ८.३० टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध केले आहे. टेकओव्हर व टॉप अप कर्ज उपलब्धता दिली आहे. तसेच मोफत वैयक्तीक अपघात विमा संरक्षण देऊ केले आहे. मुदतपूर्व परतफेडीवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ७५५ रुपये इएमआय देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

इतर गृह कर्जाचे हस्तांतरण

एसबीआयने सर्वात कमी व्याजदराचा दावा करता झीरो प्रोसेसिंग फीसची घोषणा केली आहे. तसेच घरपोच कर्ज सेवा उपलब्ध केली आहे. या शिवाय इतर गृहकर्जाचे हस्तांतरण करण्याची सुविधा एसबीआयकडे आहे. जलद कर्जमंजुरीची सेवा उपलब्ध केली आहे.

सिबिल स्कोरनुसार व्याजदर

बॅंक ऑफ महाराष्ट्राने महा सुपर फ्लेक्सी हाउसिंग लोन योजनेत अनेक आकर्षक सुविधा देऊ केल्या आहेत. ९० टक्के कर्ज पुरवठ्यासोबत शून्य प्रोसेसिंग फीसची उपलब्धता केली गेली आहे. ग्राहकाच्या सिबीलस्कोरला कर्जाचे व्याजदर लिंक करण्यात आले आहेत.

होम लोन ॲडव्हांटेज

बॅंक ऑफ बडोदाने कर्ज खात्याला जोडलेल्या बचत खात्यात जमा केलेल्या रकमेनुसार कर्जात व्याज सवलतीची योजना दिली आहे. होम लोन ॲडव्हांटेज योजनेत या पद्धतीची सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे ग्राहकाची केवळ बचतीची रक्कम बचत खात्यात असेल तरीही त्याला कर्ज व्याजदरात लाभ मिळतो.

ठळक बाबी

  • कमीत कमी व्याजदर देण्याचा प्रयत्न

  • प्लॉट खरेदीपासून कर्जाच्या योजना

  • प्रोसेसिंग शुल्कावर मोठ्या प्रमाणात सवलत

  • मासिक हप्त्याची रक्कम कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न

  • घरभाड्याच्या तुलनेत स्वतःचे घर बांधणे सोपे करण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT