0vahan_20japt. 
सोलापूर

गृह मंत्रालयाचा निर्णय ! जप्त वाहनांबद्दल पोलिस आयुक्‍त म्हणाले...

तात्या लांडगे
सोलापूर : कोरोनाच्या वैश्‍विक संकटाला हद्दपार करण्याच्या हेतूने जाहीर केलेल्या लॉकडाउन व संचारंबदीचे उल्लंघन करणाऱ्या आठ हजार 127 बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. फौजदार चावडी व सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली वाहने संपूर्ण लॉकडाउन उठल्याशिवाय सोडली जाणार नसून तत्पूर्वी संबंधित वाहनांवरील संपूर्ण दंड भरावा लागेल, असे पोलिस आयुक्‍तांनी स्पष्ट केले.


सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत सात पोलिस ठाणे असून या पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 21 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत पोलिसांचा त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूर अद्याप कोरोना या विषाणूच्या विळख्यात आलेले नसून नागरिकांनी खबरदारी घेतल्याचे पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी सांगितले. मात्र, काहीजण कारण नसताना तथा किरकोळ कारण असूनही घराबाहेर पडत आहेत. आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक बेशिस्त नागरिकांवर गुन्हे दाखल केले असून एक हजारांपर्यंत वाहने जप्त केली आहेत. दरम्यान, आता जीवनाश्‍यक वस्तू खरेदीसाठी वेळ निश्‍चित केली असून त्याच वेळेत नागरिकांनी भाजी अथवा किरणा वस्तू खरेदी करावयाच्या आहेत, असेही आयुक्‍त शिंदे यांनी स्पष्ट केले. विनाकारण घराबाहेर पडलेल्यांवर लॉकडाउन असेपर्यंत कारवाई केली जाईल तर जप्त केलेली वाहने संपूर्ण लॉकडाउन संपेपर्यंत सोडली जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 


सोलापुकरांनी करुन दाखविले : सातत्य ठेवा 
राज्यभरात कोरोना या विषाणूचा विळखा वाढू लागला असतानाही विशेषत: सोलापुरच्या सीममेवरील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाही सोलापूर अद्याप कोरोनापासून चार हात लांबच आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे ठोस नियोजन अन्‌ नागरिकांनी घेतलेली खबरदारी, यामुळे ते शक्‍य झाले आहे. आणखी काही दिवस सोलापुकरांनी त्यात सातत्य ठेवल्यास कोरोना येणारच नाही, असा विश्‍वास पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी व्यक्‍त केला. बेशिस्त नागरिकांवर तथा वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Mumbai Tour: सचिन तेंडुलकरसोबत भेट ते प्रदर्शनीय सामना... लिओनेल मेस्सीच्या मुंबई दौऱ्याचे अपडेट्स एका क्लिकवर

Tips For JEE Main Preparation: 12वी बोर्ड परीक्षेसोबत JEE Main ची तयारी कशी करावी? जाणून घ्या एक्सपर्टकडून

Latest Marathi News Live Update: १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात

Viral Video: खरा तो एकची धर्म ! महिलेने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सकाळी केलं असं काही... नेटकऱ्यांकडून होतेय प्रशंसा

IPL 2026 Auction पूर्वी मोठा 'खेला'! जो ऑलराऊंडर सर्वात महागडा ठरू शकतो, त्याची फक्त फलंदाज म्हणून नोंदणी; कुणी केला गेम?

SCROLL FOR NEXT