Hunted by attacking six animals in four days in pandharpur taluka 
सोलापूर

पंढरपूर तालुक्‍यात चार दिवसांत सहा जनावरांवर हल्ले करून केली शिकार 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : तुंगत, मगरवाडी (ता. पंढरपूर) परिसरात मागील चार दिवसांपासून बिबट्यासदृश वन्य प्राण्याने धुमाकूळ घातला आहे. त्याने चार दिवसांत सहा जनावरांवर हल्ले करून शिकार केली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने या भागातील शेतकऱ्यांत घबराट निर्माण झाली आहे. 
सध्या कोरोनाने सगळीकडे शांतता आहे. परिसरात रात्रीच्या वेळी फारसे कोणी फिरत नसल्याने बिबट्यासदृश वन्य प्राण्याचा मुक्त संचार सुरू आहे. तुंगत परिसरात आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याचे येथील प्रत्यक्षदर्शी काही शेतकऱ्यांनी सांगितले. मागील चार ते पाच दिवसांपासून या परिसरात बिबट्या आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच बिबट्यासदृश वन्य प्राण्याने चार दिवसांत पाच ते सहा जनावरांची शिकार केली आहे. यात शेळ्या, बोकड आणि एका लहान रेडकाचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी मगरवाडी येथे दोन शेळ्या तर तुंगत येथे एका शेळीची शिकार केली होती. त्यानंतर बुधवारी (ता. 13) रात्री तुंगत येथील शेतकरी महिला शोभा भोसले यांच्या वस्तीत येऊन बिबट्यासदृश वन्य प्राण्याने एक बोकड आणि रेडकावर हल्ला करून शिकार केली. या घटनेनंतर पुन्हा या भागात एकच खळबळ उडाली आहे. 
बिबट्यासदृश वन्य प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाने रात्रीची गस्त सुरू केली आहे. शिवाय तुंगत परिसरात पिंजरा लावला आहे. परिसरात असलेल्या वन्य प्राण्याची हालचाल टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आहे. 
येथील वन परीक्षेत्र अधिकारी सुनीता पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भागात नागरिकांत जागृती करण्याचे काम सुरू केले आहे. गावांत बिबट्या विषयीची पोस्टर आणि माहिती फलक लावले आहेत. पंढरपूर विभागाच्या वन अधिकारी जे. एन. पवार यांनी तुंगत व मगरवाडी येथील घटनास्थळाला भेट देऊन वन कर्मचारी आणि परिसरातील शेतकऱ्यांना सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

Chh. Sambhajinagar News: चार पोलिस असूनही विद्यार्थ्याला लुटले; सिडकोतील प्रकार,तीन मुख्य चौकांत लूटमारीच्या वाढत्या घटना

SCROLL FOR NEXT