सोलापूर

पती घरात आल अन्‌...नंतर काय घडले वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

बार्शी (सोलापूर) : शहरात सुभाषनगर भागात राहणाऱ्या महिलेने पती शेतातून घरी येताच बंद असलेले दार उघडून घरातील एकाच्या साहाय्याने पतीच्या डोक्‍यात लोखंडी खलबत्त्याचा ठोंबा घालून जखमी केले. बार्शी शहर पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. 

पतीने दिली पोलिसात फिर्याद 
पतीने फिर्याद दिली असून पत्नीसह एक मुलगा, मुलगी असून त्यावेळी घरात नव्हते. ही घटना काल (शुक्रवार) दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली. पतीने खिडकीतून आरडा-ओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याची सोडवणूक केली. पतीचा शेती हा व्यवसाय असून आई-वडील शेतात राहतात. त्यांना भेटण्यास व शेतीची माहिती घेण्यासाठी सकाळी आठ वाजता गावाकडे जाऊन दुपारी बार्शीला परत आले. 

शिवीगाळ करून केली मारहाण 
घराचा दरवाजा बंद होता. कडी वाजवल्यानंतर पत्नीने दरवाजा उघडला. बाथरूममध्ये हात-तोंड धूताना स्वच्छतागृहातून एक जण बाहेर आला. त्यावेळी पत्नी त्यास म्हणाली मारा यांस बाहेर जाऊ देऊ नका. पत्नी व त्याने दोघांनी शिवीगाळ करून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. पत्नीने लोखंडी खलबत्त्यातील ठोंबा उचलून डोक्‍यात घातला. त्यामुळे जखमी झालो. शेजाऱ्यांना खिडकीतून आरडा-ओरड करून बोलावले. शेजारी जमल्यानंतर ती व्यक्‍ती निघून गेली. आई-वडिलांना बोलावून घेतल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू आहेत, असे फिर्यादीत पतीने नमूद केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT