sarpanch
sarpanch 
सोलापूर

मला नाही तर माझ्या पत्नीला तरी मिळेल उमेदवारी ! बुधवारी दिसली सौभाग्यवतींसाठी "श्रीं'ची धावपळ 

सूर्यकांत बनकर, करकंब

करकंब (सोलापूर) : राज्यभरातील जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी बुधवारी अर्ज भरावयाचा शेवटचा दिवस होता. पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे पन्नास टक्के आरक्षणामुळे प्रत्येक गावात पुरुषांपेक्षा महिलांसाठी एक जागा जास्त आरक्षित आहे. त्यामुळे महिला आरक्षित जागेवर आपल्या सौभाग्यवतीचा अर्ज भरण्यासाठी श्रींची धावपळ पाहायला मिळाली. याचबरोबर आरक्षित जागेवर आपलीच आई, भावजय, यांना उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड दिसून आली. 

या वर्षी सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणुकीनंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे जर सरपंचपद महिलेसाठी राखीव झाले तर आपली संधी वाया जाऊ नये यासाठी देखील इच्छुक उमेदवारांकडून स्वतःबरोबरच पत्नीचे देखील अर्ज दाखल करण्यात आले आहेत. परिणामी एकाच घरातील पती-पत्नी, माय-लेकरे, दीर-भावजय असे अनेक अर्ज ग्रामपंचायतीसाठी दाखल झाले आहेत. 

या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदललेली सामाजिक परिस्थिती, जीवनशैली व अनेक मान्यवरांचे झालेले अकाली निधन यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विविध स्तरांवरून आवाहन करण्यात आले होते. काही जणांनी तर बिनविरोध ग्रामपंचायतींना लाखो रुपयांची बक्षिसे देखील जाहीर केलेली होती. पण तरीही एखाद दुसरा अपवाद वगळता त्यास प्रतिसाद मिळालाच नाही. त्यामुळे सरपंचपदाच्या खुर्चीचा सत्तासंघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. काहीही झाले तरी सत्ताधाऱ्यांकडून खुर्ची अबाधित ठेवण्यासाठी तर विरोधकांकडून खुर्ची खेचून आणण्यासाठी मागील महिनाभरापासूनच जंग-जंग पछाडले जात आहे. 

याआधीच्या टप्प्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेमधून सरपंचपद निवडले होते. त्यादृष्टीनेही काही गावांमधून कारभारपण आपल्याकडेच राहण्याच्या दृष्टीने राजकीय पुढाऱ्यांनी नियोजन केले होते. परंतु शासनाने पुन्हा एकदा नवनिर्वाचित सदस्यांमधूनच सरपंचपद निवडण्याचा आदेश काढला. पण त्यात सरपंचपदाचे आरक्षण हे नहमीप्रमाणे निवडणुकीआधी न काढता निवडणुकीनंतर काढण्याची खोच मारून गावपुढाऱ्यांची चांगलीच पंचाईत करून ठेवली. त्यामुळे आता त्यांना सरपंचपदाचा मुकूट आपल्याच गोटात ठेवण्यासाठी बहुमताबरोबरच प्रत्येक प्रवर्गाचा उमेदवार निवडून आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. शिवाय महिला प्रवर्गासाठी आरक्षण निघाले तर सरपंचपद आपल्याच घरात राहील यादृष्टीनेही स्वतःसह आई, पत्नी, भावजय यांचे सुरक्षित जागेवरून अर्ज भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातून अनेक ठिकाणी सख्ख्या नात्यांमध्ये परस्पर विरोधी अर्ज भरण्यात आले आहेत. नेमके चित्र अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी (4 जानेवारी) स्पष्ट होईलच; पण बुधवारी मात्र आपल्या "सौ'साठी "श्रीं'ची चाललेली धावपळ सर्वांनाच पाहायला मिळाली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT