doctor.jpg 
सोलापूर

संसर्गाचा धोका सारखाच तर डॉक्‍टरांच्या वेतनात फरक कशासाठी? 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः कोरोना साथीच्या काळात कर्तव्यावर असलेल्या बीएएमएस डॉक्‍टरांना इतर डॉक्‍टरांप्रमाणेच जबाबदारी, कर्तव्यासोबत कोरोना संसर्गाचा धोका देखील तेवढाच आहे. तेव्हा ऍलोपॅथी प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांप्रमाणेच या आयुर्वेदिक डॉक्‍टरांना समान वेतन व आर्थिक लाभ द्यावेत, अशी मागणी निमा संघटनेकडून केली जात आहे. 

शिवसेनेच्या प्रवक्‍त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. "निमा'च्या मुंबई जिल्हा शाखेने देखील याप्रश्‍नी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना पत्र दिले आहे. 

आजतागायत या दोन्ही डॉक्‍टरांमध्ये अनावश्‍यक भेदभाव निर्माण केला आहे. बीएएमएस डॉक्‍टरांना एमबीबीएस डॉक्‍टरांच्या तुलनेत कमी लेखण्यात येते. त्यांना मानधन कमी देण्यात येते. या दोन्ही डॉक्‍टरांच्या मानधनातील तफावत दूर करण्यासाठी राज्य शासनाने मार्चमध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संमतीनंतर दोन्ही डॉक्‍टरांना समान मानधन देण्यासाठी 21 मे 1981 रोजी शासनाने निर्णय घेतला आहे. 
आता कोविडच्या प्रादुर्भावामुळे डॉक्‍टरांच्या भरतीसाठी जाहिराती येत आहेत. या जाहिरातीत अजूनही एमबीबीएस डॉक्‍टरांचे मानधन बीएएमएस डॉक्‍टरांपेक्षा जास्त दर्शविण्यात येते. आजही अनेक खासगी रुग्णालयांत निवासी डॉक्‍टर म्हणून अनेक बीएएमएस डॉक्‍टर तुटपुंज्या वेतनात काम करीत आहेत. एमबीबीएस डॉक्‍टरांच्या तुलनेत त्यांना कमी लेखण्यात येते व मानधनसुद्धा कमी देण्यात येते. सध्या दोन्ही प्रकारच्या डॉक्‍टरांना समान काम करावे लागत आहे. कोरोना संकटात हे डॉक्‍टर काम करीत असून त्यांनादेखील संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे धोका पत्करण्याचे कार्य सर्वच डॉक्‍टर करीत असतील, तर बीएएमएस डॉक्‍टरांसोबत होत असलेल्या अन्यायाविषयी निमा मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय सहसमन्वयक डॉ. संजय लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अन्याय दूर करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून बीएएमएस डॉक्‍टरांना समान वेतन मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT