Important news for students 
सोलापूर

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी

अशोक मुरुमकर

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १०१९-२० या शैक्षणिक वर्षातील नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या.  विद्यार्थ्यांना त्यांच्या सहामाही परीक्षेतील गुणांच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निर्देशही दिलेले आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्याना सहामाही परीक्षेत चांगले प्रदर्शन करता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन परीक्षा देण्याची संधी देवून पुढील प्रवेश देता येईल. यासाठी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करावी, अशी मागणी राज्याच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आहे. याच्या परिणामांना सामान्य नागरिकांना देखील सामोरे जावे लागत आहे. अशा परीस्थितीत विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळावा. म्हणून सिस्कॉम संस्थेच्या वतीने शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे. याबाबतचे पत्र सरकारला मेलद्वारे पाठविले आहे. यामध्ये म्हटले की, ज्या शैक्षणिक संस्थांना शक्य असेल अशा संस्थांनी होतकरू विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्याचे आवाहन करावे, २०२०- २१ या शैक्षणिक वर्षात शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी मागील वर्षापेक्षा अधिक शुल्क आकारू नये. अधिक शुल्क आकारणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांवर कोणती कारवाई केली जाईल हे जाहीर करावे, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संपूर्ण वर्षाचे शुल्क एक रकमी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांकडे तगादा करू नये. 
हेही वाचा : ब्रेकिंग : कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 10 डॉक्‍टरांसह 47 जण क्वारंटाईन 
सोयीनुसार शुल्क भरण्याची मुभा मिळावी,  पूर्वप्राथमिक ते १२ वीपर्यंत शुल्क भरता आले नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येणार नसल्याचे सरकारने जाहीर करावे. विद्यार्थ्याला शाळेतून काढल्यास काय कारवाई केली जाईल हे जाहीर करावेल,  शाळांनी विद्यार्थ्यांकडे चांगल्या स्थितीत असणारी पुस्तके जमा करून घ्यावीत व गरजू विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. विद्यार्थी व पालकांनी शैक्षणिक साहित्य नवीनच घेण्याचा आग्रह करू नये, KG To PG ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जावी मात्र आजच्या परिस्थितीत बहुतेक पालकांना ऑनलाईन प्रवेशाची माहिती नसताना यापद्धतीने प्रवेशास परवानगी नसावी. ऑनलाईन येणारे अर्ज जरूर स्वीकारावेत परंतु प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया लॉकडाऊन संपल्यानंतर गुणवत्तेनुसार राबवावी. एन्ट्री पॉईंटसाठीची गुणवत्ता म्हणजे शाळेपासून जवळचे विद्यार्थी ही असेल असे जाहीर करावे, विद्यार्थ्यांना त्यांच्या सहामाही परीक्षेतील गुणांच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्याना सहामाही परीक्षेत चांगले प्रदर्शन करता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन परीक्षा देण्याची संधी देवून पुढील प्रवेश देता येईल. यासाठी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करावी, असे या पत्रात म्हटले आहे. संस्थेच्या संचालिका वैशाली बाफना यांनी हे पत्र प्रसिद्धसाठी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT