file photo 
सोलापूर

दारुड्या बापानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

दत्तात्रय खंडागळे

नराधम बापाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगोला (सोलापूर): माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगोला तालुक्यातील एका गावात घडली आहे. दारुड्या वडीलांनीच आपल्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व हे कोणाला सांगितले तर नरड्यावर पाय देऊन मारुन टाकण्याची धमकी दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

सांगोला तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एकास दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी मागील तीन महिन्यापासून घर सोडून गेली होती. त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी अपत्ये असून त्यांची आई घर सोडून गेल्याने त्या लहान मुलांचा सांभाळ शेजारी करत होते. एके दिवशी ही भावांडे जेवण करुन झोपले असताना वडील रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत घरी आला. त्यानंतर त्या दारुड्या नराधम बापाने आपल्या नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. तसेच सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या नरड्यावर पाय देऊन जीवे मारून टाकीन, कशी मेली ते कुणाला कळणार नाही अशी धमकी दिली.

दरम्यान सदरचा घडलेला प्रकार त्या अल्पवयीन पीडित मुलीने सांभाळ करणाऱ्या शेजाऱ्यांना सांगितला. सदरचा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी लागलीच सांगोला पोलीस ठाण्यात कळवले. त्यानंतर सदर पीडित मुलगी, तिची आजी, मामा व सांभाळ करणारे शेजारी हे सर्वजण सांगोला पोलिस ठाण्यात आले. सदरची घटना घडून पाच सहा दिवस झाले आहेत. नराधम बापाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note: भारतात प्लास्टिकच्या नोटा कधी सुरू होणार? RBI गव्हर्नरांनी 'ती' वेळच सांगितली; महत्त्वाची माहिती समोर

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

SCROLL FOR NEXT