Solapur News
Solapur News Esakal
सोलापूर

Solapur News: सोलापूरात प्रस्थापितांच्या अडथळ्यात अडकलेल्यांना खुणावतोय ‘बीआरएस’

श्रीनिवास दुध्याल

अनेक दशकांपूर्वी एनटी रामाराव यांच्या तेलुगु देसम पक्षाचा बोलबाला सोलापुरात पाहावयास मिळाला. परंतु या पक्षाचा एकच नगरसेवक त्याकाळी प्रकाश मारता यांच्या रूपाने निवडून आला होता. त्यानंतर तेलुगु देसम पक्षाला उतरती कळा लागली, ती आता नावापुरतीसुद्धा उरली नाही. हल्ली तर राजकारणाच्या क्षेत्रात अनेक राजकीय पक्षांची मांदियाळी पाहावयास मिळते. या पक्षांतील प्रस्थापित नेत्यांमुळे इच्छा असूनही संधी मिळू न शकलेल्या जुन्या अन्‌ नवख्या तरुणांना तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष खुणावतोय. आता हा पक्ष किती जम बसवतो हे आगामी महापालिका, झेडपी निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव हे २ जून २०१४ मध्ये तेलंगणचे प्रथम मुख्यमंत्री बनले. २०१८ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांनी तेलंगणमध्ये आयटी इंडस्ट्री, टेक्स्टाईल पार्क, शेतकऱ्यांना अनुदान, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, सर्वांत कमी कर, स्वस्त धान्य किट अशी एकूणच विकासाची गती पाहता, सोलापुरातील जनतेसाठी तसाच विकास हवा आहे. येथील तेलुगु बांधवांमधूनही तशी चर्चा नेहमीच असते.

सोलापुरात पाच लाखांच्या आसपास तेलुगु भाषिकांची संख्या आहे. त्यात पद्मशाली, तोगटवीर, मोची, निलगार, कोष्टी अशा अनेक समाजांचा समावेश होतो. त्यामुळे केसीआर यांनी सोलापूरमध्ये बीआरएसचे रोपटे लावलंय. त्यांनी प्रथम येथील तेलुगु भाषकांची नाडी ओळखून असलेले ज्येष्ठ कांग्रेस नेते धर्मण्णा सादूल यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली; मात्र सादूल यांनी नकार देताच तेलंगणातील सिद्धीपेठ येथील मलेशम बुरा यांना केसीआर यांनी दूत म्हणून सोलापूरला पाठविले अन्‌ त्यांनी ‘नन्ना’चा पाढा वाचणारे ज्येष्ठ नेते धर्मण्णा सादूल यांना अखेर पटविलेच.

पक्षवाढीसाठी अनुकूल चेहरा हवाय

धर्मण्णा सादूल यांच्यासह येथील भाजपचे गणेश पेनगोंडा, धवलायन फाउंडेशनचे विक्रम पिस्के असे चेहरे बीआरएसमध्ये सामील झाले आहेत. मात्र, धर्मण्णा सादूल यांच्याशिवाय पक्षवाढीसाठी अनुकूल अशा चेहऱ्याच्या शोधार्थ बीआरएस आहे. मोची समाजातील काही नेत्यांनी पक्षात सहभागासाठी श्री. सादूल यांची भेट घेतल्याचे कळते. मात्र, स्थानिक सक्षम, अनुकूल असा नेता आगामी काळात पक्षात येण्याची चिन्हे आहेत.

दशरथ गोप यांची चर्चा, मात्र...

पक्षाला अनुकूल चेहरा शोधताना पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा अर्थात सचिव दशरथ गोप यांना बीआरएसने विधानसभेची ऑफर दिल्याची चर्चा शहरात जोरात सुरू आहे. पद्मशाली शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांसह पूर्वभागातील नागरिकांची ‘साहेब आमदार व्हावेत’ अशी इच्छा आहे. मात्र याबद्दल स्थानिक बीआरएसकडून अन्‌ श्री. गोप यांच्याकडून कुठलाही दुजोरा मिळू शकला नाही. श्री. गोप म्हणतात, ‘तसा ऑफर आहे, लवकरच काय तो निर्णय घेणार आहे.’ असे असले तरी श्री. गोप हे बीआरएसचे सोलापुरातील पहिले आमदार ठरतील, अशी चर्चा जोरकसपणे सुरू आहे.

पक्षप्रवेशाआधी पद काय देणार?

शहरातील अनेकजण बीआरएसमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. काही समाजसेवकांनीही या पक्षाशी संपर्क साधला आहे. काहींचा पक्षप्रवेशाचा उद्देश सोलापूरचा सर्वंकष विकास व्हावा एवढाच आहे. तर प्रस्थापित पक्षांतील काही नेत्यांनी पक्ष प्रवेशाआधीच मला कुठले पद देणार, अमुक पद द्याल तरच मी पक्षात येणार, अशा अटी घालण्यास सुरवात केल्याची चर्चा आहे.

हरीश राव यांचा होणार दौरा

तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याआधी तेलंगण राज्य मंत्रिमंडळातील अर्थमंत्री हरीश राव यांचा सोलापूर दौरा येत्या पंधरवड्यात होणार आहे. पक्षवाढीसाठी सोलापुरातील एकूणच वातावरण पाहून, त्यानंतर पक्षवाढ व पक्षाची ध्येय-धोरणे ठरवली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT