सोलापूर

टॅम्पिंग मशिनद्वारे तीन हजार किमी रेल्वे रुळाची देखभाल

विजय थोरात

सोलापूर रेल्वे विभागात टॅम्पिंग मशिनद्वारे मागील वर्षभरात तीन हजार किलोमीटरचे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे.

सोलापूर : रेल्वेने प्रवासी वाहतूक (Passenger transport) आणि मालवाहतूक या दोन्हीमध्ये अधिक गती मिळविण्यासाठी देखभालीची अत्याधुनिक साधने स्वीकारली आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभागात टॅम्पिंग मशिनद्वारे (Tamping machine) मागील वर्षभरात तीन हजार किलोमीटरचे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. (In solapur railway section, maintenance and repair work of three thousand km of railway line was carried out by tamping machine last year)

रेल्वे रुळाची गती आणि लोडिंग क्षमतेत नवीन परिमाण कायम ठेवण्यासाठी भारतीय रेल्वेने आपला ट्रॅक मजबूत केला आहे. देखभाल करण्यासाठी ट्रॅक मॅनच्या कठोर मेहनतीसह, अत्याधुनिक हायटेक मशिन्स देखील वापरली जात आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात आधुनिक मशिनसह सोलापूर विभागाने ट्रॅक स्टेबलायझर वापरण्यास सुरुवात केली आहे. जो रेल्वेतील सर्वात उच्च तंत्रज्ञानाचा वापरण्यात येत असलेला महत्वाचा पुरावा आहे. त्याचप्रमाणे सोलापूर रेल्वे विभागात पाच टॅम्पिंग मशिन्स वापरले जात आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये टॅम्पिंग मशिनसह वर्षाला 3 हजार किमी रुळांची देखभाल केली जात आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मानाकांच्या ट्रॅकचे वजन देखील अधिक आहे आणि रुळांची (रेलची) लांबी देखील जास्त आहे. गाड्यांचा वेग वाढल्यामुळे, ट्रॅकचे पॅकिंग देखील उच्च पातळीवर आणि अंतरावर केले जाते. संरेखन आणि रेखांशाचा स्तर यादृष्टीने दुरुस्त करावा लागत आहे. या सर्व गरजा लक्षात घेऊन रेल्वेकडून अत्याधुनिक टॅम्पिंग मशिन्सचा वापर करून सोलापूर विभागात रुळांच्या देखभाल दुरुस्तीची कामे मशिनव्दारे केली जात आहेत.

ठळक बाबी

टॅम्पिंग मशिन्सचा फायदा

- उच्च तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वेग वाढण्यास मदत होते

- देखभालीचा खर्च कमी

- दुरुस्तीसाठी टॅम्पिंग मशिन्स बऱ्याच काळासाठी ठेवता येतात

- मशिनचे आयुष्य 15 ते 20 वर्षांपर्यंतचे असते

- उच्च विश्वासार्हता, धारणा आणि ट्रॅकची सुरक्षा सुनिश्‍चित करते

- उच्च गुणवत्तेमुळे, कमी वेळेत जास्त काम केले जाते

सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी विभागात आर 260 मीटर लांबीच्या रुळांचा वापर केला जात आहे. जेणेकरुन रुळ आर 260 मीटर लांबीचे असल्यामुळे वेल्डींग जॉईंटची संख्या कमी होईल. जॉईटची संख्या कमी झाल्याने रेल फ्रॅक्‍चर कमी होतील. आर 260 मीटर लांबीचे रुळ सक्षम असणार आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रवासी गाड्या व मालवाहतूक गाड्या आता अधिक क्षमतेने धावण्यास सोयीचे होणार आहे. (In solapur railway section, maintenance and repair work of three thousand km of railway line was carried out by tamping machine last year)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT