police sakal news
सोलापूर

पोलिस ठाण्यातच स्वीकारली लाच! दोन हजार घेतानाच अडकला जाळ्यात

पोलिस विभागातील वाढत्या लाचखोरीमुळे हे खाते बदनाम होऊ लागले आहे.

तात्या लांडगे

पोलिस विभागातील वाढत्या लाचखोरीमुळे हे खाते बदनाम होऊ लागले आहे.

सोलापूर : शिवीगाळीतून भांडण झाल्यानंतर दोघांनी सदर बझार पोलिस ठाण्यात परस्परविरुध्द तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी सर्जेराव शंकर पाटील या पोलिसाने त्या तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील दोन हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्जेराव पाटील यास रंगेहाथ पकडले.

पोलिसांत परस्परविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर एकाने आपल्यावर काही कारवाई होऊ नये म्हणून पोलिस नाईक सर्जेराव शंकर पाटील याच्याकडे मागणी केली. त्यावेळी पाटील याने तक्रारदाराला दहा हजार रुपये मागितले. रक्‍कम मोठी असल्याने तक्रारदाराने तडजोड करून पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यावेळी ती रक्‍कम दोन टप्प्यात देण्याचे निश्‍चित झाले. दोन हजार रुपयांची लाच घेताना पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आणि सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांना माहिती देऊन पाटील यास अटक केली. त्याच्याविरुध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक यांच्या पथकाने केली.

पोलिस ठाण्यातच घेतली लाच

तक्रारदारावरील कारवाई टाळण्यासाठी पोलिस नाईक सर्जेराव पाटील याने थेट पोलिस ठाण्यात त्याला बोलावून लाच स्वीकारली. त्याबद्दल पोलिस ठाण्यातील कुणालाही मागमूस लागला नाही. परंतु, त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन हजार रुपये स्वीकारल्यानंतर सर्जेराव पाटील याला रंगेहाथ पकडले. आता त्याला सोमवारी (ता. 6) न्यायालयात हजर केले जाणार असून, लाच घेताना पकडलेल्या पाटील याच्यावर पोलिस आयुक्‍त हरिष बैजल हे निलंबनाची कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे. पोलिस विभागातील वाढत्या लाचखोरीमुळे हे खाते बदनाम होऊ लागले आहे. त्यामुळे असे प्रकार भविष्यात होणार नाहीत, यादृष्टीने ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Weekly Horoscope 24 to 30 November 2025: लक्ष्मी नारायण राजयोग मेष अन् कर्क राशीसह 5 राशींना करेल मालामाल

Latest Marathi News Live Update : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

SCROLL FOR NEXT