शेवटी आईच्या उदरनिर्वाहासाठी मुलांना द्यावीच लागली पोटगी ! Canva
सोलापूर

...शेवटी आईच्या उदरनिर्वाहासाठी मुलांना द्यावीच लागली पोटगी !

शेवटी आईच्या उदरनिर्वाहासाठी मुलांना द्यावीच लागली पोटगी ! प्रांताधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

तात्या लांडगे

पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या आईला मुलांनी उदरनिर्वाहासाठी दरमहा चार हजारांची पोटगी द्यावी, असा आदेश प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी नुकताच दिला.

सोलापूर : पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या आईला मुलांनी उदरनिर्वाहासाठी दरमहा चार हजारांची पोटगी (Alimony) द्यावी, असा आदेश प्रांताधिकारी हेमंत निकम (Hemant Nikam) यांनी नुकताच दिला. 2019 पासून प्रलंबित पोटगी अर्जावर निकम यांनी अंतिम आदेश दिल्यानंतर आता सरोजिनीबाई नारायणराव पिठ्ठा (वय 68) यांच्या दोन्ही मुलांना पोटगी द्यावी लागणार आहे.

अक्‍कलकोट एमआयडीसी रोड परिसरातील सरोजिनीबाई पिठ्ठा यांनी 7 जून 2019 रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे पोटगीसाठी मुलांविरुद्ध अर्ज केला होता. ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण भत्ता मिळावा म्हणून त्यांनी अर्ज केला होता. तत्पूर्वी, टेक्‍स्टाईल उद्योजक नारायण पिठ्ठा यांचे 25 ऑक्‍टोबर 2015 मध्ये निधन झाले होते. त्यांना तीन मुली व दोन मुले असून सर्वांचे विवाह झाले आहेत. एका मुलीच्या पतीचे निधन झाले असून ती मुलांसह आई सरोजिनीबाईकडेच राहते. या पार्श्‍वभूमीवर औषधोपचार, घरखर्चासाठी पोटगी मिळावी, असा त्यांचा अर्ज होता. त्यावर सातत्याने सुनावणी झाली, दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद, लेखी म्हणणे, कागदपत्रांची पडताळणी करून प्रांताधिकाऱ्यांनी हा निकाल दिला. तत्पूर्वी, सरोजिनीबाई यांच्या श्रीनिवास व भास्कर या दोन्ही मुलांनी प्रांताधिकाऱ्यांकडे पोटगी देण्यासारखी आईची परिस्थिती नाजूक नसल्याबद्दल पुरावे सादर केले. पतीच्या मृत्यूनंतर विधवा बहिणी खासगी कंपनीत जॉबला असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पतीच्या मृत्यूनंतर एकाकी असलेल्या आईने उदरनिर्वाहासाठी मुलांनी पोटगी द्यावी, यासाठी जून 2019 मध्ये अर्ज केला. दोन वर्षांनी तो अर्ज निकाली निघाला. प्रांताधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण भत्ता अधिनियम- 2007 मधील तरतुदीचा आधार घेऊन सरोजिनीबाईंच्या बाजूने निकाल दिला.

प्रांताधिकाऱ्यांच्या निकालातील ठळक बाबी...

  • दोन्ही मुलांनी आई सरोजिनीबाई पिठ्ठा यांना दरमहा द्यावी चार हजारांची पोटगी

  • मृत नारायणराव पिठ्ठा यांच्या मृत्युपत्रानुसार 44 पैकी आठ लूम्सचे भाडेही सरोजिनीबाईंना द्यावे

  • दिवाणी न्यायालय, सोलापूर येथील दाखल दिवाणी दाव्यातील निर्णय दोन्ही मुलांसाठी बंधनकारक असतील

  • मुले आणि आई दोघेही विभक्‍त असून मुलांनी आठपैकी चार लूम्सचेच भाडे आतापर्यंत दिले, परंतु आठ लूम्सचे भाडे द्यावे लागेल

  • आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोन्ही मुलांवर कायदेशीर कारवाई होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT