esakal
सोलापूर

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत दुप्पट बालके बाधित

तात्या लांडगे

तिसऱ्या लाटेपूर्वीच पालकांनी आपापल्या बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील कोरोना (Corona) बाधितांबरोबरच मृतांची संख्या दुप्पट झाली. त्यात बालकांचाही (children)समावेश असून जिल्ह्यातील 0 ते 15 वयोगटातील तीन हजार 129 बालके पहिल्या लाटेत बाधित झाली. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या दुप्पट होऊन सहा हजार 912 बालके कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळली. त्यातील एकाचा मृत्यू (Died) झाला. आता तिसऱ्या लाटेत ही संख्या पुन्हा दुप्पट होऊ शकते, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. (in the second wave, several children became infected with the corona)

या पार्श्‍वभूमीवर कामानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या पालकांनी घरात आल्यानंतर मुलांपासून थोडे दूर राहावे, मुलांना घराबाहेर पडू देऊ नये, मास्क, सोशल डिस्टंसिंगचा वापर करावाच लागेल आणि थोडीशी लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने पालकांना केले आहे.

सप्टेंबर अथवा डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्‍यता टास्क फोर्सकडून सांगण्यात आले आहे. या लाटेत को-मॉर्बिड, ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत बालकेच सर्वाधिक बाधित होतील, असाही अंदाज व्यक्‍त केला आहे. तत्पूर्वी, पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील बार्शी, सांगोला, माळशिरस, पंढरपूर या तालुक्‍यातील बालके सर्वाधिक बाधित झाली. पहिल्या लाटेत (26 एप्रिल 2020 ते 28 फेब्रुवारी 2021) जिल्हाभरातील एक हजार 739 मुले तर एक हजार 391 मुली कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. तर दुसऱ्या लाटेत (1 मार्च ते 22 जून 2021) तीन हजार 888 मुले आणि तीन हजार 24 मुलींना (22 जूनपर्यंत) कोरोनाची बाधा झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे.

दरम्यान, 'मुलं माझी जबाबदारी'अंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख 29 हजार 187 शाळकरी मुलांची (0 ते 15 वयोगट) आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामध्ये अडीच हजार मुलांना पूर्वीचे आजार असल्याचे तर 26 मुले कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील 106 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेपूर्वीच पालकांनी आपापल्या बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पहिल्या लाटेतील बाधित बालके (0 ते 15)

मुले- 1738

मुली- 1391

मृत्यू- 2

दुसऱ्या लाटेतील बाधित बालके

मुले- 3888

मुली- 3024

मृत्यू- 1

नऊ तालुक्‍यात को-मॉर्बिड बालके सर्वाधिक

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरातील दोन लाख 29 हजार 187 बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामध्ये अंदाजित अडीच हजारांहून अधिक बालके को-मॉर्बिड आढळली आहेत. मंगळवेढा (265), बार्शी (496), पंढरपूर (441), अक्‍कलकोट (172), दक्षिण सोलापूर (248), उत्तर सोलापूर (211), माळशिरस (155), करमाळा (302), सांगोला (121) या तालुक्‍यात सर्वाधिक को-मॉर्बिड बालके असल्याचे समोर आले आहे. तर मोहोळ तालुक्‍यात 90, माळशिरस तालुक्‍यात 41 बालकांना पूर्वीचे आजार असल्याची बाबही समोर आली आहे.

(in the second wave, several children became infected with the corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

२२ दिवसांपूर्वी उद्घाटन, एक्सप्रेसवे खचला; पॅचवर्क सुकवण्यासाठी लावले १० पंखे, VIDEO VIRAL

Asaram Bapu Bail Rejected : आसाराम बापूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, नेमकं कारण काय?

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये मोठे बदल; '@all' टॅगसह आले ३ नवीन धमाकेदार फीचर्स!

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT