solapur immunity clinic.jpg 
सोलापूर

सोलापूर शहरात पहिल्या इम्युनिटी क्‍लिनिकचे उद्घाटन 

प्रकाश सनपूरकर


सोलापूरः कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्‍टरांची निमा संघटना पुढाकार घेत असून इम्युनिटी क्‍लिनिक्‍सची अभिनव संकल्पना राबवत आहे. त्या माध्यमातून सोलापुरात पहिल्या टप्प्यात सात इम्युनिटी क्‍लिनिक सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती निमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी सांगितले. 

भारती विद्यापीठ परिसरतील सन्मती नगरात डॉ. सारिका वैभव होमकर यांच्या श्री साई क्‍लिनिक या सोलापुरातील पहिल्या इम्युनिटी क्‍लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोलापूर निमा अध्यक्ष डॉ. रूपेश येडके, डॉ. सचिन पांढरे, सचिव डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. स्मीता बुब, डॉ. नितीन बलदवा, डॉ. रमाकांत आयचित, डॉ. राघव नादरगी, डॉ. रतनलाल संगेवाडीकर, डॉ. नागनाथ जिड्डीमणी आदी उपस्थित होते. 

ते पुढे म्हणाले की, कोविड आयुष टास्क फोर्स, महाराष्ट्र शासन आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा संलग्नित निमा आयुर्वेद इम्युनिटी क्‍लिनिक संपूर्ण राज्यभर सुरु करण्यात येत आहेत. कोरोना या आजारावर अजूनही टक्के प्रभावी औषधे किंवा लस उपलब्ध नसून आपली प्रतिकार शक्ती चांगली असल्यास आजार न होणे किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे सिद्ध झाले आहे. याच धर्तीवर आयुर्वेद इम्युनिटी क्‍लिनिक ची संकल्पना समोर आली आहे. 
डॉ. सारिका होमकर यांनी सांगितले की, क्‍लिनिक मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन इम्युनिटी किट देण्यात येईल. प्रकृती परीक्षण आणि इम्युनिटी स्कोअर निश्‍चित करून त्या- त्या व्यक्तींनुसार त्यांना आवश्‍यक अशा 10 दिवसांच्या आयुर्वेदिक गोळ्या देण्यात येतील. तसेच दैनंदिन जीवन पद्धतीतील बदल, व्यायाम, योगाभ्यास याचे व्यक्तिपरत्वे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीने या क्‍लीनिक मध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे दोन महिन्यात किमान चार वेळा येणे आवश्‍यक राहिल. त्यासाठी सुरुवातीला एकदा माफक नोंदणीशुल्क आकारले जाईल. नंतर ठरलेल्या प्रोटोकॉल नुसार फक्त औषधीचे माफक शुल्क (ना नफा ना तोटा तत्वावर) आणि आवश्‍यक त्या औषधी लिहून दिल्यास त्या बाहेरून खरेदी कराव्या लागतील. हे सर्व एका विशिष्ट प्रोटोकॉल नुसार राहील असे सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Mini Goa: चक्क यूपीतच आहे 'मिनी गोवा'! कॅम्पिंग, जंगल सफारी अन् कैंची धामची शांती; 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT