Increasing demand for electricity from farmers and household consumers solapur
Increasing demand for electricity from farmers and household consumers solapur  sakal
सोलापूर

मोहोळ तालुक्यात विजेची मागणी वाढली; नवीन उच्च दाब सबस्टेशनची मागणी

राजकुमार शहा

मोहोळ : तालुक्यातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांची विजेची वाढती मागणी पाहता मोहोळ तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी लांबोटी च्या धर्तीवर 10 ते 15 एकर क्षेत्रावर आणखी एका उच्च विद्युत दाब स्टेशनची उभारणी ची गरज असल्याची माहिती मोहोळ येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुरेश पवार यांनी दिली. दरम्यान आपल्याला पॉवरग्रिड मधून येणारी वीज शंभर टक्के क्षमतेने आल्यास वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे वातावरणात मोठी उष्णता वाढली आहे. शेतीपंपासाठी तसेच घरगुती वीज मागणीत अचानक वाढ झाली आहे. सध्या ऊस भुईमूग मका यासह डाळिंब, द्राक्षे, पेरू, सीताफळ, या फळबागांना पाण्याची अत्यंत गरज आहे. वातावरणातील उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या आपल्याला बारामती येथील पॉवरग्रिड मधुन विद्युत पुरवठा होतो. मात्र तो येताना त्यात दहा टक्के गळती होते, तसेच तो इथे आपल्याकडे आल्यानंतर तो वितरित करतानाही त्यात गळती होते, त्यामुळे सुरळीत वीज पुरवठा होत नाही. मोहोळ तालुक्यातील आष्टी तलाव, भीमा व सिना नदी, आष्टी उपसा सिंचन योजना, यामुळे अपवाद वगळता सर्वच भाग बागायती झाला आहे. त्यामुळे विजेची मागणी वरचेवर वाढतीच आहे.

सध्या तालुक्यात लांबोटी, मोहोळ व शेजारील पुळुज ही उच्च दाब विद्युत वाहिनीची सबस्टेशन आहेत. मोहोळ च्या विद्युत केंद्राची क्षमता कमी आहे ती वाढविणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यात पिरटाकळी, पोखरापूर, कुरणवाडी, पासलेवाडी यासह अन्य गावात नवीन सबस्टेशन मंजूर झाली आहेत, ती लवकर कार्यान्वीत झाली तर विद्युत पुरवठा समान देता येणार आहे. लवकरात लवकर या सबस्टेशनची कामे झाली नाहीत तर आहे ही सबस्टेशन ओव्हरलोड होण्यास वेळ लागणार नाही.

विभागीय कार्यालयाची गरज

मोहोळ तालुक्यात एकशे चार गावे आहेत. त्यासाठी मोहोळ येथे एकच मुख्य महावितरणचे कार्यालय आहे. त्यामुळे नागरिकांची वेळेत कामे होत नाहीत, परिणामी नागरिक व अधिकारी संघर्ष कायम सुरू असतो. त्यासाठी मोहोळ तालुक्यात आणखी विभागीय कार्यालय झाले तर नागरिकांच्या अडचणी सुटणार आहेत, तसेच सध्याच्या कार्यालयावरील ताण ही कमी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT