Ujani Dam Update: Water Discharge Stopped Amid Rising Inflow Sakal
सोलापूर

Solapur News: 'उजनी धरणाचे सर्व दरवाजे बंद, विसर्ग थांबविला'; धरणात ११ हजार क्युसेकची आवक

८ जुलैपर्यंत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार नाही, जेणेकरून आषाढी वारीचा सोहळा व्यवस्थित पार पडेल हा हेतू आहे. उजनी धरणात सध्या दौंड व स्थानिक परिसरातून १२ हजारांहून अधिक क्युसेकची आवक जमा होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर/पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी वारीचा सोहळा ६ जुलैला पंढरपुरात रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून १३ ते १५ लाख भाविक पंढरपूरमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे, वाळवंट परिसरात पाण्याचा विसर्ग जास्त राहू नये, यासाठी आता उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सकाळपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंट परिसरातील विसर्ग कमी होणार आहे.

उजनी धरण सध्या ७३ टक्क्यांपर्यंत भरले असून धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी सोडण्यात येणारे १६०० क्युसेक पाणी देखील बंद करण्यात आले आहे. ८ जुलैपर्यंत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार नाही, जेणेकरून आषाढी वारीचा सोहळा व्यवस्थित पार पडेल हा हेतू आहे. उजनी धरणात सध्या दौंड व स्थानिक परिसरातून १२ हजारांहून अधिक क्युसेकची आवक जमा होत आहे. पण, धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद केल्याने पुढील पाच दिवसांत धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरेल, अशी स्थिती आहे.

धरणात सध्या एकूण १०३ टीएमसी पाणी असून त्यात ३९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग देखील आता बंद करण्यात आला आहे. ८ जुलैनंतर पुन्हा धरणाचे दरवाजे उघडले जाणार असून त्यावेळी सुमारे ३० हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग भीमा नदीत सोडला जावू शकतो. कारण, पुढे आणखी दोन महिने पावसाळा असल्याने धरणाची पातळी नियोजनानुसार ठेवणे शक्य होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या काटेकोर नियोजनाचा सकारात्मक परिणाम

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग शून्य करण्यात यावा, आशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांना दिल्या होत्या. त्यानुसार जलसंपदा विभागाने तत्काळ कार्यवाही करून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात येणारा विसर्ग शून्य केला आहे. मागील पंधरा दिवसापासून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर येथे भीमा नदी पात्रातील विसर्ग स्थिर करून वाळवंट रिकामे व्हावे, यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी केलेल्या सुक्ष्म व काटेकोर नियोजनामुळे हे शक्य झाले.

धरणातून सोडलेले पाणी असे...

सीना-माढा उपसा सिंचन योजना : ८० क्युसेक

दहिगाव उपसा सिंचन योजना : ८० क्युसेक

बोगदा : ९०० क्युसेक

कालव्यातून सोडलेले पाणी : १५०० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT