Inquiry order for sale of scrap of Vitthal factory 
सोलापूर

विठ्ठल कारखान्याच्या संचालक मंडळाचा पाय आणखी खोलात 

भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : थकीत वेतन आणि एफआरपीसाठी कामगार आणि शेतकऱ्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. अशातच आता कारखान्याने अलीकडेच विक्री केलेल्या भंगार (स्क्रॅप) प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) विशेष लेखापरीक्षकांना दिले आहेत. भंगार विक्री प्रकरणाची चौकशी सुरु झाल्याने संचालक मंडळाचा पाय आणखी खोलात गेला आहे. 

येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे कारखाना यंदा बंद ठेवण्याची वेळ संचालक मंडळावर आली आहे. कारखाना बंद असतानाच कामगारांचे गेल्या वर्षभरापासून वेतन थकले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची सुमारे 5 कोटी 69 लाख रुपयांची एफआरपीची रक्कम कारखान्याने अद्याप दिली नाही. थकीत वेतन आणि एफआरपी मिळावी यासाठी कामगार आणि शेतकरी एकाच वेळी आक्रमक झाले आहेत. अशातच आता कारखान्याने विक्री केलेल्या भंगाराची चौकशी सुरु झाली आहे. भंगार विक्री प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अशी लेखी तक्रार कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी अलीकडेच सोलापूर येथील साखर सहसंचालकांकडे केली होती. 
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने साखर आयुक्तांची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता कारखान्यातील शेकडो टन भंगाराची विक्री अहमदनगर येथील व्यापाऱ्यास केली आहे. वास्तविक सदर विक्री रितसर टेंडर काढून करणे आवश्‍यक व कायदेशीर होते. तथापी कारखान्याने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता भंगार विक्री केलेली आहे. सदर भंगार विक्री प्रकरणी करण्यात आलेला व्यवहार हा रोखीने व हातोहात केला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी लेखी मागणी अमरजित पाटील यांनी केली आहे. 
तक्रारी अर्जानुसार साखर सहसंचालकांनी सोलापूर येथील विशेष लेखा परीक्षकांना (सहकारी संस्था) या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन तसा वस्तुस्थिती दर्शक व कारवाई सूचक अहवाल साखर सहसंचालकांकडे पाठवावा, असेही लेखी पत्रात साखर सहसंचालकांनी नमूद केले आहे. विठ्ठलच्या भंगार विक्री प्रकरणाची चौकशी सुरु झाल्याने सभासदांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT