सोलापूर

कंत्राटी, रोजंदारी कोरोना योद्धांनाही 50 लाखांचा अपघात विमा कवच

विजयकुमार सोनवणे


सोलापूर - कोरोना विषाणुची बाधा होऊन कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये रोजंदारी, कंत्राटी
कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाव्यतिरीक्त इतर विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांना या विम्याचे कवच मिळणार आहे. या निर्णयाचा अंमल 30 सप्टेंबर 2020 पर्यंत असणार आहे. या संदर्भातील आदेश वित्त विभागाने जारी केला आहे. 

कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्य ही कर्तव्ये बजावत असताना कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणुशी जवळचा संबंध येत आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी हे विम्याचे कवच असणार आहे. या संदर्भात विमा कंपनीशी बोलून अंतिम आराखडा तयार केला जात आहे, दरम्यानच्या कालावधीत दुर्देवाने कोणाचा मृत्यू झाल्यास कोविड योद्धांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. 

कोरोना युद्धात केवळ आरोग्य विभागातीलच नव्हे तर इतर विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत. त्यामध्ये जिल्हा प्रशासन, पोलिस, अंगणवाडी, लेखा कोषागरे, अन्न व नागरी पुरवठा, घरोघरी सर्व्हेक्षणासाठी नियुक्त केलेल्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. कर्तव्यावर असताना अशा कर्मचाऱ्यांचा दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना या निर्णयानुसार मदत मिळणार आहे. कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक सर्वंकष अपघात विमा उतरविण्यात येणार आहे. विम्याचे स्वरुप अंतिम होईपर्यंत दरम्यानच्या कालावधीत दुर्देवी घटना झाल्यास संबंधितांच्या वारसांना 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये कंत्राटी, बाह्यस्त्रोताद्वारे घेतलेले कर्मचारी,रोजंदारी, तदर्थ व मानसेवी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

स्थानिक संस्थांही राबविणार योजना
राज्य शासनाच्या धर्तीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जसे महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायतींसह राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठीही अशा पद्धतीची सानुग्रह साह्य योजना राबविली जाणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT