सोलापूर ः पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 482 एकर मधील काही गटातील जमिनीवर वन खात्याचे अधिकार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विकासासाठी अडचणी निर्माण होत आहे. तरी त्या जमिनीचा ताबा विद्यापीठाला मिळण्यासाठी तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीसाठी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, कुलसचिव डॉ. विकास घुटे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आमदार कल्याणशेट्टी यांनी विद्यापीठास भेट देऊन विद्यापीठाच्या विविध प्रश्नांची कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याकडून माहिती घेतली होती. त्यानुसार आमदार कल्याणशेट्टी यांच्या मागणीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी वनखात्याच्या जमिन अधिकारामुळे विद्यापीठाच्या विकासाला अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन जिल्हाधिकारी शंभरकर आणि आमदार कल्याणशेट्टी यांनी यशस्वी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. लवकरच हा प्रश्न मिटला जाईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. त्यामुळे विद्यापीठाच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.