mase.jpg 
सोलापूर

पोलिसांच्या मारापेक्षा घर चालवणे जास्त कठीण

प्रकाश सनपूरकर


सोलापूरः "सकाळी मासे लांब अंतरावरून उधारीवर आणायचे अन्‌ विकण्याच्या धडपडीत वेळ अपुरा पडल्याने पोलिसांचा मार खाल्ल्याशिवाय काही उपाय राहिला नाही. पण, पोलिसांच्या मारापेक्षा घर चालवण्याचे संकट मोठे आहे', अशी भावना मासे विक्रेता विशाल गायकवाड यांनी व्यक्त केली. 

मरिआई चौकाजवळ असलेल्या रेल्वे पुलाच्या वर विशाल गायकवाड मासे विकतात. लॉकडाउनपूर्वी त्यांची 200 ते 300 रुपये कमाई व्हायची. नंतर लॉकडाउनमुळे धंदा बंद पडला. काही दिवस घरात बसून काढले. 

घरात आजारी वडील, आई, दोन भाऊ यांचा सर्व भार विशालच्या मासे विक्रीवर आहे. इंदापूर येथून दररोज मासे आणून येथे रस्त्यावर विकण्याचे काम करतात. आधी इंदापुरातून टेम्पोने मासे वाहतूक व्हायची. पण, लॉकडाउनमुळे ती वाहतूक बंद पडली. लॉकडाउनच्या कालावधीत घर चालवण्यासाठी जवळ असलेले पैसे खर्च झाले. स्वस्त धान्य दुकानावर माल मिळेल या आशेने ते गेले. तर त्यांच्याकडे मोठ्या आर्थिक उत्पन्न गटाचे केशरी कार्ड असल्याने त्यांना धान्य मिळाले नाही. 
तेव्हा त्यांनी दुचाकीवर जाऊन इंदापुरातील मासे पुरवठादाराला गाठले. त्यांना विनंती करून उधारीवर मासे मागितले. मासे विकून त्याचे पैसे देण्याचे त्यांनी मान्य केले. थोडे फार मासे मिळाले तर विकण्यासाठी ग्राहक कमी झाले. रस्त्यावरून जेवढे ग्राहक अधूनमधून जातील, तेवढ्यावरच त्यांची विक्री सुरू आहे. ही कमाई कधी 100 ते 150 रुपयांपर्यंत जाते. त्यातील मासे खरेदीचा मोबदला देऊन 50 रुपयांची कमाई देखील होईनाशी झाली आहे. 
सकाळी मासे आणून त्याची विक्री होण्याआधीच लॉकडाउनमधील विक्रीची वेळ संपत असल्याने पोलिसांचा मार खाण्याची वेळ येते. पण, तरीही आणखी काही मासे विकले तर काही खर्च निघेल म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. पोलिसांच्या मारापेक्षा घराचा खर्च चालवण्याची चिंता मोठी आहे, असे त्यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Mumbai News: BKC मध्ये थरार! जिओ वर्ल्ड ड्राईव्हजवळ ७ फूट अजगर आढळला; पाहा व्हायरल व्हिडिओ

"काम करणारे लोक भिकारी नाहीत.." मानधन बुडवणाऱ्या निर्मात्यांवर संतापली निळू फुलेंची लेक

'धुरंधर'मधील 'तो' डान्स नाही, तर १००० वर्षांचा वारसा; वाचा या थक्क करणाऱ्या परंपरेमागचा खरा इतिहास!

SCROLL FOR NEXT