kannada and urdu teachers merger education sanjay javir solapur esakal
सोलापूर

Solapur News : कन्नड व उर्दू शिक्षकांचे समायोजन होणार; शिक्षणाधिकारी संजय जावीर

शिक्षणाधिकारी जावीर यांची माहिती; १७ जण जिल्हा परिषदेच्या शाळेत होणार वर्ग

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या कन्नड व उर्दू माध्यमातील शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केले जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी त्यासंदर्भात प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना निवेदन दिले होते.

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्टृ राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी जावीर यांना अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात निवेदन दिले होते. अप्पासाहेब पाटील, अप्पाराव इटेकर, विनोद आगलावे व अ.गफूर अरब यांनी त्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली होती.

१०१८-१९च्या सेवकसंचानुसार अल्पसंख्यांक शाळेतील कन्नड व उर्दू माध्यमातील ११ व सहा शिक्षक अतिरिक्त ठरले होते. ४ आक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये करण्यात यावे, अशी मागणी संयुक्त कृती समितीतर्फे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्याकडे करण्यात आली होती.

त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी त्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावा अशी विनंती करण्याची विनंती या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे केली आहे.

यावेळी पंचप्पा तुप्पद, रिजवान शेख आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साडेपाचशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्या १७ अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली समायोजनाची कार्यवाही पार पडेल.

१५२ शाळांना मिळणार मुख्याध्यापक

जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ पैकी १५२ शाळांना कायमस्वरूपी मुख्याध्यापकच नव्हते. सेवाज्येष्ठतेनुसार तेथील शिक्षकांकडेच मुख्याध्यापकाचा पदभार सोपविण्यात आला होता. शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली १५२ शाळांना परमनंन्ट मुख्याध्यापक मिळणार आहेत. गुरुवारी (ता. १८) त्यासंदर्भातील कार्यवाही पार पडणार आहे. दुसरीकडे त्याच दिवशी सहा विस्ताराधिकारी पदासाठी पदोन्नती देखील दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' तारखेला परतीचा मान्सून धडकणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Panchang 11 September 2025: आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करावे

Kolhapur Gas Explosion : कोल्हापूर गॅस स्फोट प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या ५ वर्षीय प्रज्वलची झुंज व्यर्थ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

Pro Kabaddi 12: यु मुम्बाची ताकद डिफेन्स की रेडिंग? कर्णधार सुनील कुमारने उलगडले रहस्य; पुणेरी पलटणबद्दल म्हणाला...

Latest Marathi News Updates : अक्कलकोटमधील वागदरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

SCROLL FOR NEXT