shivsharan vaniparit (2).jpg
shivsharan vaniparit (2).jpg 
सोलापूर

शरीर सदृढ ठेवा...कोमट पाणी व आवळा ज्यूसचे नियमित सेवन : कराटे प्रशिक्षक शिवशरण वाणीपरीट यांचा संकल्प

अमोल व्यवहारे


सोलापूर : सध्याच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे माणसाला विविध व्याधी जडत असताना दररोज सकाळी कोमट पाणी व आवळा ज्यूसचे नियमित सेवन करणे, सदृढ शरीरासाठी गरजेचे आहे, असे शिवलिला स्पोर्टस्‌ ऍकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व कराटे प्रशिक्षक शिवशरण वाणीपरीट बोलत होते. 
नव्या वर्षाच्या क्रिडाबद्दल संकल्पना मांडतांना वाणीपरीट यांनी अनेक गोष्टीबरोबरच त्यांच्या चांगल्या सवयींचाही उहापोह केला. शाळा, कॉलेजमध्ये असतानाच कराटेबद्दल आकर्षण वाढले आणि त्यातूनच स्वत: कराटेचे प्रशिक्षण घेतले. शाळेत असल्यापासूनच दररोज पहाटे उठायची सवय असल्यामुळे नंतरच्या काळात शरीर सदृढ राहण्यासाठी कोमट पाणी पिणे व आवळा ज्यूस पिण्यास सुरवात केली. दररोज सकाळी सहा वाजता उठून योगासन, प्राणायामकरून नंतर कोमट पाणी व आवळा ज्यूस पिणे क्रमप्राप्त होते. यामुळे शारीरिक बळकटी वाढविण्यासाठी खूप मदत होते. त्याचप्रमाणे मानसिक क्षमता व रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी प्राणायाम व योगासनांची मदत होते. 
शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सन 1999 पासून 2013 पर्यंत कराटे व प्राणायामचे प्रशिक्षण कराटे प्रशिक्षक (कै.) सुरेश जाधव यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. कराटेचे प्रशिक्षण घेत असताना बेल्टचा एकेक टप्पा पार करीत ब्लॅक बेल्ट मिळविला. प्रशिक्षण काळातच सलग 20 वर्षे सुवर्णपदक प्राप्त केले. एकीकडे कराटे प्रशिक्षणाची एकेक शिखरे पादाक्रांत करतानाच आपल्या परिसरातील मुले-मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्याचा विचार केला व त्यातून शिवलिला स्पोर्टस्‌ ऍकॅडमीची स्थापना करण्यात आली. लक्ष्मी पेठ, जानकर नगर येथे सुरु करण्यात आलेल्या ऍकॅडमीमधून अनेक मुले-मुली कराटेचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. त्यानंतर सदगुरू बाजीआण्णा महाराज मठ येथे नियमितपणे ऍकॅडमीच्या माध्यमातून मुलां शारीरिक, मानसिक व बौध्दीक विकासाठी मार्गदर्शन केले जाते. आगामी काळात वसंत विहार, उमा नगरी या परिसरातील मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी कराटे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यातून एक सदृढ व बलशाली पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असून यामध्ये खंड पडू न देण्याचा आपला संकल्प असून तो तडीस नेणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT