Khandu Rengde Karmala land record office caught accepting bribe of Rs 2500 crime police  esakal
सोलापूर

Karmala News : करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील खंडू रेंगडे यास 2500 रुपयाची लाच स्वीकारताना पकडले

तक्रारदानाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार केली

आण्णा काळे

करमाळा : करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक (वर्ग 3 )खंडू मारुती रेंगडे याला 2500 रुपयाची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

तक्रारदाराने त्याच्या मोरवड(ता .करमाळा) हद्दीतील जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चित करणे व हद्दी निश्चित केल्यानंतर त्याची नकाशा प्रिंट काढणे यासाठी तातडीच्या मोजणीसाठी अर्ज केला होता.

त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय 3 हजार रुपये फी चलनाद्वारे भरली होती. यातील तक्रारदार यांनी शासकीय फी चलनाद्वारे भरलेली असताना देखील परिरक्षण भूमापक खंडू रेंगडे याने मोजणी करून हद्द कायम करणे व नकाशा प्रिंट काढण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयाचे लाचेची मागणी केली. 3000 लाचीची मागणी केल्यानंतर तडजोडी आणती 2500 रुपये लाच देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर

तक्रारदानाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवार (ता.25 ) रोजी लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खंडू रेंगडे यास 2500 रूपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, पोलिस काॅन्टेबल गजानन किणगी, श्याम सुरवसे यांनी केली आहे.

करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या कामासाठी सतत लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी कायम येत असतात त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर नेमके यात कोण सापडले याची उत्सुकता सर्वांनाच लागल्याने कारवाईनंतर या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT