Barshi 
सोलापूर

खांडवीत हातगाडीवरून केला तरुणांनी निवडणुकीचा प्रचार; पाच जागा जिंकत सत्ताधाऱ्यांना दिली प्रथमच टक्कर ! 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामीण भागात लोकशाहीचा जागर पाहायला मिळाला. अनेक गावांत तरुणांना ग्रामपंचायतींमध्ये सत्ता करण्याची संधी ग्रामस्थांनी दिली आहे, तरुणाईला प्रोत्साहन दिले आहे. त्यापैकीच एक गाव आहे खांडवी. येथील तरुणांनी सत्ताधाऱ्यांशी दोन हात करून पहिल्याच निवडणुकीत टक्कर देऊन नऊ पैकी पाच तरुण उमेदवार निवडून आणले असून, तालुक्‍यात त्यांचे कौतुक होत आहे. 

शहरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या खांडवी-गोडसेवाडी ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची झाली. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात तीन हजार 253 मतदार आहेत. या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये 80, दोनमध्ये 85, तीनमध्ये 82, चारमध्ये 78 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग एकमध्ये तर "नोटा'ला 198 मते पडली आहेत. या प्रभागात त्यांचा उमेदवार उभा नव्हता. 

निवडणूक जाहीर होताच खंडेश्वर ग्रामविकास आघाडी, श्री खंडेश्वर महाविकास परिवर्तन आघाडी अन्‌ खंडेश्वर महाविकास आघाडी असे तीन पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले होते. सत्ताधारी व बुजूर्ग ज्येष्ठ मंडळी यांच्या विरोधात प्रथमच गावातील तरुणांनी दंड थोपटले अन्‌ श्री खंडेश्वर महाविकास परिवर्तन आघाडी स्थापन केली. सर्व तरुणांना निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केले. दोन अर्ज छाननीत बाद झाले. 11 जागांपैकी 9 जागा लढवल्या आणि पाच जण विजयी झाले आहेत. 

शहरापासून अवघे आठ किलोमीटरवर गाव पण विकास नाही, गावात परिवर्तन घडवायचेच, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रचारास सुरवात केली. एकही उमेदवार धनदांडगा, गर्भश्रीमंत नाही. पैसे नाहीत, सर्वसामान्य कुटुंबातील सर्व उमेदवार. सभा घेतली नाही तर प्रचार हातगाडीवर केला. मतदान ओळख पत्रिका प्रसिद्धीसाठी छापल्या व हातगाडीवरून वाटल्या. पाच ते सहा हजार खर्च आला असेल फक्त. प्रदूषणमुक्त प्रचार करायचा, कमी खर्चात निवडणुका होतात हे दाखवून द्यायचे होते, असे विजयी सदस्य आकाश दळवी यांनी आवर्जून सांगितले. 

गोडसेवाडी येथे पाण्याची टंचाई खूप आहे. टाकी बांधून अनेक वर्षे झाली पण टाकीत पाणी काही अजून आलेच नाही. पाइपलाइन, रस्ते, गटारी, पाणी या समस्यांसह नेहमीच दबावाचे राजकारण तरुण पाहात होते. अनेक विकासकामे केवळ कागदावरच दिसत असून भावी पिढीच्या भवितव्यासाठी, शैक्षणिक, आरोग्य, वृक्षारोपण करून नैसर्गिक समतोल साधण्याचा आमचा पाच नूतन सदस्यांचा अजेंडा असणार आहे, असेही दळवी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

खांडवी-गोडसेवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच या तरुणांनी लढवली असून यामध्ये आकाश पांडुरंग दळवी (वय 23), योगीराज कल्याण सातपुते (वय 25), सचिन कुंडलिक चोरघडे (वय 24), सुवर्णा बालाजी वाघमारे (वय 35), मीना विनोद गपाट अशी ग्रामस्थांनी निवडलेल्या नूतन सदस्यांची नावे आहेत. या तरुणांना प्रवीण घोडके आणि विनोद गपाट यांनी मार्गदर्शन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Subhash Deshmukh: सत्तेची फळे चाखण्यासाठीच भाजपमध्ये इनकमिंग: आमदार सुभाष देशमुख; विरोधकांना पराभव दिसू लागला

Latest Marathi Live Update News: गेवराई नगर परिषदेवर पुन्हा पवारांचा झेंडा फडकणार की पंडित बाजी मारणार

PMRDA News : प्रत्यक्ष स्थळ पाहणीनंतरच विकास परवानगी; अवैध बांधकामे रोखण्यासाठी ‘पीएमआरडीए’चा निर्णय, ‘पेपर मंजुरी’ला पूर्णविराम

D-Mart मध्ये शॉपिंगची तयारी करताय? आधी हे वाचा... नाहीतर खिसा होणार रिकामा! मुंबईतील धक्कादायक प्रकाराने सगळे हैराण

Google Maps : गुगल मॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; ट्रॅफिक, छुपे कॅमेरे अन् लँडमार्कची अचूक माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT