Somaiya Canva
सोलापूर

"वाझे, देशमुख, सिंग, परब यांच्यानंतर आव्हाड यांचा नंबर !

किरीट सोमय्या म्हणाले की आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर लागेल

सकाळ वृत्तसेवा

सोमय्या म्हणाले, शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत. संजय राऊत यांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एस.आर.ए.चे गाळे ढापले आहेत, हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे.

सोलापूर : सचिन वाझे (Sachin Wajhe) यांच्यासोबत पाच ऑफिसर निलंबित झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना जेलमध्ये जाण्याची पाळी आली. परमबीर सिंग (Parambir Singh)) घरी गेले, आता अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा नंबर लागणार, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी सोलापुरात केला. (Kirit Somaiya said that now Jitendra Awhad will have the number)

उद्धव ठाकरे सरकारच्या (Uddhav Thackeray government) कोव्हिड (Covid-19) करप्शनला भाजप विरोध करत आहे. हे सरकार पाच वर्षे टिकावं मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणार आहे, असेही सोमय्या या वेळी म्हणाले.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत. संजय राऊत यांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एस. आर. ए. चे गाळे ढापले आहेत, हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड हे आता लाइनीत आहेत. त्यामुळे "आगे आगे देखो होता हैं क्‍या !' असं म्हणत सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनाही डिवचलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा एवढा घमेंड करू नये. जालन्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना पाच पोलिसांकडून जी मारहाण झाली ती निंदनीय आहे.

त्यातील चार पोलिस निलंबित झाले आहेत, त्याचबरोबर या प्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी व्हायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: अजित पवार यांच्याकडून दगडूशेठ गणपतीची पूजा सुरू

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Asian Hockey Cup 2025 : भारतीय महिलांचा दणदणीत विजय; थायलंडचा ११-० ने धुव्वा

Latest Maharashtra News Updates : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

Vijay Wadettiwar: सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार; 'ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केल्याचा आरोप'

SCROLL FOR NEXT