सोलापूर

कुळव, तिफणच्या दुरुस्तीला वेग 

रमेश दास

वाळूज (सोलापूर) : मृगाच्या पहिल्या पावसाने बुधवारी (ता.10) रात्री मोहोळ तालुक्‍यात वाळूज, देगावसह परिसरात दमदार हजेरी लावली. वाफसा होताच बळीराजा खरिपाच्या पेरणीला सुरवात करणार आहे. पेरणीसाठी आवश्‍यक कुळव, तिफण ही अवजारे दुरुस्तीसाठी सुताराच्या नेटावर शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. 

नागझरी नदीला गुडघाभर पाणी 
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मृग नक्षत्राच्या पहिल्याच दमदार पावसाने वाळूज परिसरातील देगाव, भैरववाडी, मनगोळी (ता. मोहोळ) तसेच साखरेवाडी, भागाईवाडी (उत्तर सोलापूर) शिवारात तीन ते चार तास दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाने वाळूज येथील भोगावती व नागझरी नदीला गुडघाभर पाणी होते. पावसाने शेतकरी सुखावला असून वाफसा होताच खरिपाच्या पेरणीला सुरवात करणार आहे. 

शेतकऱ्यांची लगबग सुरू 
आवश्‍यक बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. पेरणीस आवश्‍यक अवजारे दुरुस्त करण्यासाठी लोहार व सुताराच्या नेटवर शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पूर्वी बैलांवर अवलंबून असलेली शेती आता ट्रॅक्‍टरचा वापर करून यांत्रिक पद्धतीने केली जात आहे. मात्र, काही शेतकरी आजही बैलाच्या साहाय्याने तिफणीच्या चाड्यावर मूठ धरून पेरणी आणि नांगर व कुळवाच्या रुमण्यावर भार देऊन शेतीची मशागत करतात. 

सर्जा- राजाच्या जीवावरच शेती 
आज ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने अनेक शेतकरी शेती करत असले तरी आमच्यासारखा अनुभवी शेतकरी सर्जा- राजाच्या जीवावरच शेती पिकवतो. 
- इंद्रसेन मोटे, शेतकरी, वाळूज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT