Beaten Up 
सोलापूर

कुर्डू येथे पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग; रोख रक्कम चोरली, गाडीचेही केले मोठे नुकसान 

वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) : पतीला उपचारासाठी घेऊन जात असताना कुर्डुवाडी येथील टेंभुर्णी चौकातील जागेच्या वादावरून पतीला प्राणघातक मारहाण करण्यात आली. रोख रक्कम काढून घेतली व पत्नीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (ता. 6) कुर्डुवाडी-पंढरपूर रोडवरील कुर्डू हद्दीतील कदम हॉस्पिटलच्या आवारात दुपारी तीन वाजता घडली. यामध्ये गाडीचेही मोठे नुकसान केल्याची फिर्याद कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 

अश्विनी रणजित शिनगारे (वय 33, रा. चौधरी प्लॉट, कुर्डुवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, अश्‍विनी शिनगारे यांचे पती रणजित शिनगारे हे कुर्डुवाडी नगरपालिका येथे नोकरीस असून, त्यांची आजारी असल्याने त्यांना फिर्यादी व त्यांची सासू फुलाबाई, ड्रायव्हर गणेश यांच्यासह कदम हॉस्पिटल येथे उपचारासाठी कारमधून (एमएच 45 - पी 7555) आले होते. शिनगारे व संदीप खारे, आबा खारे यांच्यासोबत टेभुर्णी चौकाजवळील कुर्डुवाडी येथील जागेबाबत वाद आहेत. यावरून म्हैसगावचे संदीप अंबादास खारे, आबासाहेब खारे, संतोष सूर्यभान खारे, तानाजी खारे, संदीप पंडित पाटील, शरद शहाजी पाटील, राहुल गोरे, सागर गोरे, शिवाजी गोरे व इतर सातजण शिनगारे यांना गाडीच्या बाहेर खेचले. त्या वेळी आबासाहेब खारे, संदीप खारे हे हातात लोखंडी कोयते घेऊन उभे होते. संतोष खारे, तानाजी खारे, संदीप पाटील, शरद पाटील, राहुल गोरे, सागर गोरे, शिवाजी गोरे यांच्या हातात लाकडी दांडके होते. 

तेथे संदीप खारे हा त्यांच्यासोबतच्या साथीदारांना, शिनगारे याला आता जिवंत सोडायचे नाही. जागेबाबत नेहमीच वाद घालतो, असे म्हणून सर्वांनी लोखंडी कोयत्यांनी व लाकडी दांडक्‍यांनी कार फोडली व कारसह पेटवून देण्याची धमकी दिली. तेथे राहुल गोरे, सागर गोरे, शिवाजी गोरे यांनी फिर्यादीचे पती रणजित शिनगारे यांना खाली पाडले व गळ्यावर पाय देऊन गळा दाबून जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी अश्‍विनी, त्यांच्या सासू, व ड्रायव्हर गणेश यांनी रणजित शिनगारे यांना वाचवत असताना इतर सर्वांनी देखील अश्‍विनी व रणजित शिनगारे यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्या वेळी संदीप खारे, आबा खारे, संतोष खारे, जब्बार महाजन, संदीप पंडित पाटील, शरद शहाजी पाटील यांनी अश्‍विनी यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्यांच्या पर्समधील दवाखान्यासाठी आणलेले एक लाख रुपये त्यांच्यापैकी कोणीतरी काढून घेतले. लोकांची गर्दी जमू लागल्याने ते सर्वजण लाकडी दांडके तेथेच टाकून लोखंडी कोयत्यासह पळून गेले. 

संशयितांवर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : युती तोडल्याचे खापर कुणावर? गिरीश महाजन लक्ष्य, तर भाजपकडून शिवसेनेवर पलटवार

सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टला पोहोचली झी मराठीची कमळी; स्वतःच्या नावाच्या गाण्यावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाण

Explainer : व्हॉट्सअ‍ॅप न्यू ईयर ग्रीटिंग स्कॅम काय आहे? एक मेसेज अन् बँक अकाऊंट होईल रिकामं..कसं राहालं सुरक्षित? वाचा A टू Z माहिती

Thane BJP Office Suvarna Kamble चा राडा, उमेदवारी नाकारल्यानं कार्यालयात गोंधळ | Video Viral | Sakal News

SCROLL FOR NEXT