आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी Canva
सोलापूर

आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी

आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी

दत्तात्रय खंडागळे, राजकुमार शहा

ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजतात संपूर्ण सांगोला तालुक्‍यात हळहळ व्यक्त करण्यात आली.

सांगोला (सोलापूर) : ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या निधनाचे वृत्त समजतात संपूर्ण सांगोला (Sangola) तालुक्‍यात हळहळ व्यक्त करण्यात आली. आज शनिवारी (ता. 31) रोजी सकाळी सोलापूरहून त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्‍यात येणार असल्याने पंढरपूर - सांगोला रस्त्यावर त्यांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावर तर फक्त आबासाहेबांचे फोटो झळकत आहेत. (Large crowd on the streets to pay their last respects to Ganapatrao Deshmukh-ssd73)

शुक्रवारी रात्री माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावरून समजल्यावर सोशल मीडियावर फक्त आबासाहेबांचे फोटो व त्यांचे कर्तृत्व झळकत होते. याबाबत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना विविध कमेंट्‌सही दिल्या जात होत्या. आज शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्‍यात दर्शनासाठी येणार असल्याने सांगोला - पंढरपूर रस्त्यावरील गावा-गावात नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उभे होते. पंढरपूरवरून येताना रस्त्यावरून खर्डी, संगेवाडी, मांजरी, मेथवडे फाटा, बामणी, बिलेवाडी फाटा या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्‍यातील संगेवाडी येथे आबासाहेबांचे पार्थिव आले असता नागरिकांनी "आबासाहेब तुम अमर रहे' अशा घोषणा दिल्या. त्यांच्या पार्थिवाजवळ त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख होते. या वेळी तालुक्‍यातील शेकापतील विविध पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफाही बरोबर होता.

मोहोळ : पेनूरचे सुपुत्र तथा सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पार्थिव पेनूर येथे येताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गावकरी जमा झाले. सर्वानी अंत्यदर्शन घेतले. स्व. गणपतराव देशमुख हे मूळचे पेनूरचे आहेत. त्यांची जन्मभूमी जरी पेनूर असली तरी त्यांची कर्मभूमी सांगोला ही राहिली आहे. कुठलाही डामडौल न करता त्यांनी 55 वर्षे विधिमंडळात आपल्या कामकाजाचा वेगळा ठसा उमटविला. पेनूर या जन्मगावी येताना नेहमी ते एस टी बसने यायचे. त्यांचे निवासस्थान पेनूर येवती रस्त्यानजीक आहे, ते त्या ठिकाणी चालत जात. त्यांना अडचणींबाबत साधी पोस्टकार्ड तरी लिहून टाकले तरी ती त्याची दखल घेत व कार्यवाही करीत. अशा या गावच्या सुपुत्राला निरोप देताना अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. अनेक गावकरी व सर्वसामान्यांनी देशमुख यांच्या डिजिटल फलकाला हार- फुले वाहून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी आमदार यशवंत माने यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, प्रकाश कस्तुरे, सरपंच सुजित आवारे, रामदास चवरे, भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, सर्जेराव चवरे, भाऊसाहेब सलगर, महादेव माने आदींसह त्यांच्या नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतले.

असा नेता पुन्हा लाभणार नाही. सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जोडली गेली होती. आमच्यासारख्या नवोदित आमदारांचे ते चालते बोलते व्यासपीठ होते.

- आमदार यशवंत माने, मोहोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT