Corona 
सोलापूर

उशिरा का होईना "या' गावात कोरोनाने खाते उघडलेच ! 50 जणांच्या टेस्टमधून "इतके' पॉझिटिव्ह 

शुभजित नष्टे

पिलीव (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील पिलीव गाव हे मोठ्या बाजारपेठेचे गाव समजले जाते. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. माळशिरस तालुक्‍यात कोरोनाने प्रवेश करूनही खूप दिवस उलटून गेले, तरीही अजून तरी कोरोना पिलीवमध्ये आला नव्हता. परंतु, आज (शनिवारी) पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्रात 50 जणांच्या कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे उशिरा का होईना कोरोनाने पिलीवमध्ये प्रवेश केलाच. 

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ज्या परिसरात सापडल्या, तो परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून, त्या दोन जणांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याचे काम सुरू आहे. त्यांना पुढील उपचारासाठी आनंदी गणेश कोव्हिड केअर सेंटर, अकलूज येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधून त्याना होम क्वारंटाईन करणे सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पिलीव गाव पूर्णपणे रविवार, सोमवार, मंगळवार असे तीन बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये एक स्वीट होमचा दुकानदार आणि एक ग्रामपंचायत कर्मचारी असल्याने हे दोघेही खूप मोठ्या संख्येने लोकांच्या संपर्कात आले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता खरोखरच पिलीव भागातील लोकांना सतर्क राहून योग्य ती काळजी घेऊन कोरोनाची साखळी तोडायला हवी. 

पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष माने-देशमुख म्हणाले, पिलीव भागातील ज्या लोकांना असे वाटते, की आपण कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलो होतो, त्यांनी स्वत:हून सेल्फ क्वारंटाईन व्हावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळावे व सॅनिटायझर वापरावे. स्वच्छतेची काळजी घ्यावी. 

पिलीव गावचे सरपंच नितीन मोहिते म्हणाले, पिलीव गावातील लोकांनी योग्य ती काळजी घेऊन रुग्णसंख्या वाढू नये, याची काळजी घ्यावी व कोरोनोची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करायला हवे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT