mla abhimanya pawar esakal
सोलापूर

Latur : आंतरजातीय विवाहाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी केली

आमदार पवार यांचे मत; लातूरमध्ये वीरशैव युवा सेवाभावी संस्थेच्या लिंगायत वधू-वर परिचय मेळाव्याला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

लातूर : बाराव्या शतकात म्हणजे शाहू, फुले व आंबेडकरांच्याही फार अगोदर महात्मा बसवेश्वर यांनी भेदभाव विरहित समाज निर्मितीचे मोठे काम केले आहे. आंतरजातीय विवाहाची सुरुवातही त्यांनीच केली. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून दोन कुटूंब व समाज एकत्र येण्यासाठी मदत होते, असे मत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.

वीरशैव युवा सेवाभावी संस्था व लिंगायत समाज संस्थेच्या वतीने रविवारी (ता. १६) आयोजित लिंगायत वधू - वर परिचय मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश धूत, मुंबईचे अभियंता राचोटी स्वामी, हैदराबादचे उद्योजक शंकरप्पा नागशेट्टी पाटील, अनिल मुळे राजकुमार हुडगे, सुरज पोस्ते, सुभाष मुक्ता व सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पवार म्हणाले, ``वधू- वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून एकाच छताखाली एकापेक्षा अधिक स्थळे पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लिंगायत समाजातील वीस टक्के मतदारांनी मला मतदान केल्याने मी आमदार होऊ शकलो.`` श्री. उटगे यांनी स्त्री - पुरुष समानतेचा संदेश देणाऱ्या मेळाव्यात वधू - वरांना त्यांच्या आवडीप्रमाणे याद्या तयार असल्याने वेळेची बचत होत असल्याचे सांगितले.

या वेळी प्रा. उमाकांत होनराव, बसवंतप्पा भरडे, पुष्पराज खुब्बा, भीमाशंकर अंकलकोटे, अभिजित चौंडा, ओंकारप्पा पंचाक्षरी, सागर मांडे, स्वागताध्यक्ष अॅड. गंगाधर हामणे, चंद्रकांत बिराजदार, सुरेश दोशट्टी, केदार रासुरे, गुरुप्रसाद येरटे, प्रा. मन्मथ पंचाक्षरी, भालचंद्र मानकरी, ज्योती सोनटक्के, विश्वनाथ सोरटे, बसवेश्वर हलकुडे, कृष्णा स्वामी, महेश कौळखेरे, मल्लिकार्जुन सोळसे, डॉ. अरविंद भातांब्रे, प्रा. ओमप्रकाश झुरुळे, प्रा. भालचंद्र येडवे व राजाभाऊ खेकडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रामलिंग ठेसे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याचे अध्यक्ष राजाभाऊ राचट्टे यांनी मनोगतातून अठरा वर्षांपासून चालणाऱ्या मेळाव्याची माहिती दिली. शिवकांत स्वामी, प्रा. सुवर्णा कारंजे व प्रा. वनिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सतीश खेकडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, सिक्रेट सर्विसने वाचवला जीव; हल्लेखोर ताब्यात, VIDEO VIRAL

Mumbai Politics: मराठी रिक्षाचालकांना अडवल्यास फोडून काढू: अमित ठाकरेंचा परप्रांतीय आंदोलकांना इशारा, अन्यथा रस्त्यावरच मार खाल!

Rahul Gandhi: ममता बॅनर्जींची गरिबांऐवजी श्रीमंतांना मदत: राहुल गांधी, ‘देशभक्त’ मोदींकडून देशाचीच विक्री!

IPL 2026: तासाभरातच वैभव सूर्यवंशीकडून अभिषेक शर्माने हिरावली Orange Cap; शर्यतीत टॉप-५ फलंदाज कोण?

विकेंडला बनवा कॅफे-स्टाइल झटपट क्रीमी एग सँडविच; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल

SCROLL FOR NEXT