Sanjay Bansode esakal
सोलापूर

Latur : आमदार बनसोडेंनी घेतला मध्यान्ह भोजनाचा आस्वाद

शासनाकडून पुरविला जाणाऱ्या मध्यान भोजनाचा दर्जा व गुणवत्तेची केली तपासणी

सकाळ डिजिटल टीम

उदगीर : महाराष्ट्र कामगार कल्याण विभागाच्या वतीने उदगीर व जळकोट तालुक्यात माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून या भागातील तीन हजार नोंदणीकृत मजुरांसाठी मध्यान्ह भोजनाची सोय केली आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना सुरू असून गुरुवारी (ता.२०) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आयोजित कामगारांच्या कार्यक्रमानंतर आमदार बनसोडे यांनी या मध्यान भोजनाचा आस्वाद घेऊन दर्जा व गुणवती तपासणी केली.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने कामगारांसाठी गेल्या अनेक वर्षापासून मध्यान भोजनाची योजना चालू आहे. मात्र त्याचा लाभ लातूर जिल्ह्याला यापूर्वी मिळत नव्हता. माजी गृहराज्यमंत्री आमदार बनसोडे यांच्या माध्यमातून ही योजना जिल्ह्यात सुरू झाली, त्यातल्या त्यात उदगीर मतदारसंघात जोमाने चालू आहे. या भागातील कामगारांच्या मध्यान्ह भोजनाची सोय झाली असून मजूर त्याचा लाभ घेत आहेत.

या मध्यान भोजनाचा दर्जा व गुणवत्ता कशा पद्धतीचा आहे, भोजन व्यवस्थित आहे की नाही, त्याचे वितरण योग्य होत आहे की नाही, याबरोबरच आमदार बनसोडे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर स्वतः भोजनाचा डब्बा घेऊन जेवण करून त्याची तपासणी केली.

भोजनाचा दर्जा व गुणवत्ता योग्य असून ही गुणवत्ता अशीच कायम ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा. श्याम डावळे, अहमद सरवर, जितेंद्र शिंदे, व्यंकटराव पाटील, फय्याज शेख, प्रदीप जोंधळे, विजय भालेराव, बसवराज ढोले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर लहानपणापासूनच करा ‘या’ गोष्टी; करीना कपूरने सांगितला पालकांसाठी खास सल्ला

Latest Marathi News Live Update : पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर टीका; बडतर्फीची मागणी

SCROLL FOR NEXT