Leopard attack in Akkalkot taluka 
सोलापूर

अक्कलकोट तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ?

सकाळ वृत्तसेवा

तडवळ (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्यातील शेगाव, धारसंग आळगे येथे शुक्रवारी (ता. १७) रात्री बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र धुमाकूळ घातलेला नेमका बिबट्या, चिता की तरस आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने एक शेळी आणि एका गायीच्या वासराला फस्त केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी अंकलगी येथे सिद्धायप्पा मंदिर परिसरात एक जंगली प्राणी दिसला होता. तो चित्तासारखा असल्याचे प्रथमदर्शनींनी सांगितले होते. त्याची माहिती सरपंच आणि पोलिस पाटील यांनी वनविभागाला दिली. त्यानंरत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन चौकशी केले. तेव्हा त्याचे ठसे घेण्यात आले. त्यानुसार ते ठसे चित्ता या प्राण्याचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले मात्र, ते ठसे नेमके कशाचे आहेत हे पुन्हा एखदा तपासले जाणार आहेत. त्यासाठी पुन्हा वनविभागाची टीम येणार आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वनपाल प्रकाश डोंगरे म्हणाले, सध्या त्याचे आढळलेल्या पाऊलखुणा या बिबट्याला जुळत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. आताच सकाळी ११ वाजता तो कलकर्जाळ येथे दिसल्याचा दूरध्वनी मला आला आहे. आम्ही त्याची ट्रॅव्हल हिस्टरी चेक करून माग घेत आहोत. वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शन या नुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.
अंकलगे येथील नगरिक अंबण्णा विजापुरे म्हणाले, गुरुवारी रात्री आम्हाला पाऊलखुणा दिसल्या होत्या त्याने आम्ही वनविभागाला कळविले होते. त्यांनी सुद्धा खुणा या बिबट्याशी जुळत असल्याचे आम्हाला सांगितले आहे. काल धारसंग येथे आढळल्याची माहिती मिळाली आहे. वनविभाग अधिकारी आज शनिवारी पुन्हा या भागात आले आहेत. आता त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT