jimi bibtya.jpg 
सोलापूर

 बिबट्याचे कुटुंब सोलापुरात नांदतेय अगदी आरामात 

प्रकाश सनपूरकर


सोलापूरः बलराम त्याच्या कुटुंबात सर्वात मोठा आहे. अन तो कुटुंबाचे नेतृत्वदेखील करतो. त्यांच्या नेतृत्वातील आक्रमकता जपत असताना त्याने त्याचे सारे वर्तन मिळालेल्या अधिवासाशी एकरूप केले आहे. राजू, जिमी व ईनाच्या सोबतीने बनलेले बलरामचे कुटुंब सोलापूरच्या शांततापूर्ण जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. 
शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील या बिबट्या कुटुंबाची कहाणी अशी रंगतदार आहे. बलराम हा तेरा वर्षाचा नरासोबत राजू, जिमी व इना हे सर्व जण एकत्रच आले. लखनौच्या झुमधून त्यांना सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात आणले गेले. या संग्रहालायात असलेला मोठा परिसर त्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त ठरला. बलराम वगळला तर इतर तिघेही सदस्य प्राणी संग्रहालयात वाढलेले आहेत. जिमी व इनाचा तर जन्मदेखील प्राणी संग्रहालयातच झालेला आहे. 
बलराम अगदी प्राणी संग्रहालयात राहत असला तरी मोठ्या परिसरामध्ये त्याला आपले नैसर्गिक जीवन चांगले जगता येते. आजही बलराम स्वतःच्या शैलीप्रमाणे निशाचर म्हणून वावरत असतो. दिवसभरात अगदी कधीतरी दिसणारा बलराम त्याच्या निशाचर स्वभावाप्रमाणे रात्रीच्या वेळी बाहेर पडून त्याचे अन्न खातो. पण राजू, जिमी व इना यांचे वागणे मात्र लखनौपासून प्राणी संग्रहालयाच्या शैलीला सरावलेले आहे. 
जिमी व इना या दोघी जणी अगदी त्यांना अन्न पुरवणाऱ्या व देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अगदी आवाजावरून ओळखतात. आवाज येताच त्या त्यांच्या जवळपास सहज येऊन जातात. त्यापैकी जिमी उत्तरप्रदेशात एका फार्म हाऊसवर राहिल्याने अधिकच माणसांशी परिचित आहे. काही महिन्यांपूर्वी बलरामच्या शेपटीला जखम झाली, तेव्हा त्याची जखम दुरुस्त करण्यासाठी उपचार केले गेले. उपचारामुळे झालेल्या वेदनेतून मुक्ततेची कृतज्ञता त्याच्या डोळ्यात अनेक दिवस कायम दिसून येत होती. मागील काही वर्षात बलरामचे कुटुंब या अधिवसाशी एकरुप झाले आहे. नैसर्गिक वर्तन, अधिवास, अन्न सुरक्षा यांच्या मदतीने बलरामचे हे कुटुंब हे अगदी शांतपणे त्यांचे जीवन जगत आहे. कदाचित सोलापूरकरांसाठी बलरामचे कुटुंब हे वेगळी विशेष ओळख बनली आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : भाजप अन् शिंदे गट, शिवसेना यांच्यात थेट लढत...विदर्भ कुणाचा? निकालांबाबत उत्सुकता

Lionel Messi India Visit : लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याने फुटबॉलप्रेमींना दिली प्रेरणादायी ऊर्जा

Nagar Parishad-Nagar Panchayat Elections Result : मतदान झालं, निकाल लागतोय; पण नगरपंचायत-नगरपरिषद यात फरक तरी काय?

Suryakumar Yadav Cricket Stats : हे ‘सूर्यग्रहण’ सुटायला हवे!

साप्ताहिक राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५

SCROLL FOR NEXT