Solapur Airport esakal
सोलापूर

Solapur Airport : विमानतळाच्या लायसनसाठी लागणार 'इतक्या' महिन्यांचा कालावधी; DGC कडून परवानगी आवश्यक, 50 कोटींची गरज

विमानतळावर नाईट लँडिंग, धावपट्टीसह इतर सुविधांचा अभाव

सकाळ डिजिटल टीम

होटगी रोड विमानतळाकडे प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी लायसन्स नाही. ते लायसन्स मिळविण्याकरिता डीजीसीएकडे अर्ज प्रस्तावित आहे.

सोलापूर : होटगी रोड (Hotgi Road) विमानतळावरून विमानसेवा (Solapur Airport) सुरू करण्यासाठी डीजीसीएकडून (DGC) विमानतळाला परवानगी मिळणे आवश्यक आहे.

ही परवानगी मिळविण्याकरिता विमानाचे उड्डाण आणि लँडीग होण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक यंत्रणेबरोबरच रन वे दुरुस्ती, ६० एकर जमिनीचे हस्तांतरण, आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती, पार्किंग, एमएसईबी लाइनचा अडथळा दूर करणे आदी सुविधा या विमानतळावर उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे.

या कामाकरिता साधारण ५० कोटींची आवश्यकता आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. होटगी रोड विमानतळ लहान नागरी विमानतळ आहे. या विमानतळावर नाईट लँडिंग, धावपट्टीसह इतर सुविधांचा अभाव आहे.

या विमानतळाकडे प्रवासी विमानांचे लायसन्स नाही. त्यामुळे एखादे विमान उतरवायचे असल्यास त्याला पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडूनच सांगण्यात येते. सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रवासी विमानांचे लायसन्स (license) घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.

हे लायसन्स मिळविण्याकरिता विमानतळावरील सर्व यंत्रणा अद्ययावत करावे लागणार आहे. त्यामध्ये रन वे दुरुस्ती, ६० एकर जमिनीचे हस्तांतरण, आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती, एमएसईबी लाइनच अडथळा दूर करणे यांसह विमानतळावर आवश्यक असलेली मूलभूत सुविधाही उपलब्ध करणे आवश्यक आहे.

होटगी रोड विमानतळावरील धावपट्टीची लांबी ही दोन हजार नऊ मीटर असून, प्रत्यक्ष वापरात ८६३ मीटर इतकीच आहे. विमानतळाची क्षमता जरी ७२ सीटरची असली तरी आज वापरात असलेल्या रन वे वरून २७ सीटरचे लहान विमान, चार्ट विमानच उतरू शकते.

सध्या हे विमानतळ कोणत्याच कॅटेगेरीत मोडत नसून हे विमानतळ अनलायसन्स आहे. त्यामुळे विमान उतरविण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते. तसेच नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने सूर्योदय ते सूर्यास्त एवढ्याच कालावधीमध्ये विमान येतात. या विमानतळावरून डे लँडिंगच करावे लागणार आहे.

नाईट लँडिंगची सुविधा या विमानतळावर अशक्य आहे. ८६३ मीटर रन वेच आजतागायत वापरात आल्याने उर्वरित रन वे वापराविना दुरवस्था झाली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे विमान उतरविण्याला अडचणी येत असल्याचे यापूर्वी सर्व्हेतून निष्पन्न झाले आहे.

डीजीसीएनी सर्व्हेत नोंदविलेल्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर प्रवासी सेवेसाठी परवानगी मिळणार आहे. या सर्वच कामांची टेंडर प्रक्रिया होऊन कामे पूर्ण करावी लागतील. ही प्रक्रिया होऊन लायसन्स मिळायला साधारण चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

होटगी रोड विमानतळाकडे प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी लायसन्स नाही. ते लायसन्स मिळविण्याकरिता डीजीसीएकडे अर्ज प्रस्तावित आहे. लायसन्स मिळविण्याकरिता विमानाचे उड्डाण व लॅंडिग होण्यासाठी संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभारावे लागणार आहे.

विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जातो. त्यानुसार विमानतळावर सुविधा द्याव्या लागतील. त्यानंतर पुन्हा या सुविधांचा सर्व्हे केला जातो. त्या अहवालावरून डीजीसीएकडून परवानगी देण्याचा निर्णय घेतला जातो. या सर्व प्रक्रियेला काही महिन्यांचा अवधी आहे.

-बनोथ चापला, व्यवस्थापक, सोलापूर विमानतळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT