Vruksh Sanskar 
सोलापूर

लॉकडाउनमध्ये "या' चिमुकल्यांमध्ये रुजला हिरवाईचा संस्कार 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : जुळे सोलापूर भागातील बालकांनी वृक्ष संस्काराच्या माध्यमातून झाडे लावण्याचे विविध प्रयोग यशस्वी केले आहेत. लॉकडाउनच्या काळात टीव्ही व मोबाईलचे जग बाजूला सारून ही मुले झाडाशी नाते जोडत आहेत. 

जुळे सोलापूरमध्ये पॅथॉलॉजिस्ट डॉ. आशा कुमठेकर यांचे स्वतःचे राहते घर आहे. घराच्या परिसरात बाग असल्याने डॉ. आशा कुमठेकर छंद म्हणून नवीन झाडे लावणे, कंपोस्ट खत तयार करणे यासोबत अनेक प्रकारचे बागकामातील प्रयोग करीत असतात. त्यांची नात नंदिनी व नातू नील हे दोघे देखील बागेत त्यांच्यासोबत झाडे लावण्याचे काम शिकू लागले. त्यांची आवड पाहून त्यांना स्वतंत्र छोट्या कुंड्या आणून दिल्या. त्यात माती भरणे, खत मिसळणे यांसारख्या कृती ते शिकले. कुंड्यात रोपे लावली. नंतर कुंड्या कोणाच्या हे ओळखू यावे म्हणून कुंड्यांवर नावे टाकू लागली. 

त्यांच्या घराजवळ मोठे झाड आहे. या झाडाला लागलेल्या शेंगाच्या बिया या मुलांनी गोळा केल्या. त्या कुंडीत पेरून त्याची रोपे तयार केली. आता ही रोपे मोठी झाली आहेत. जरबेरा फुलांची रोपे या चिमुकल्यांनी लावली. आजही ती चांगली वाढली आहेत. शाळेच्या व्यस्त वेळेतून सुटीच्या दिवशी ही मुले टीव्ही व मोबाईल बाजूला ठेवून बागेत बराच वेळ झाडांची निगा राखण्याचे काम करतात. नंदिनी कुमठेकर हिने शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात ठिबक सिंचनाचा प्रयोग मांडला होता. लॉकडाउनमध्ये या मुलांना शाळा नसल्याने भरपूर वेळ हाताशी होता. तेव्हा त्याचा उपयोग करत या मुलांनी बागेमध्ये खताची निर्मिती, झाडांची देखभाल, झाडांना पाणी देण्याच्या पद्धती अशा अनेक गोष्टी शिकून घेतल्या. त्यातील काही प्रयोग त्यांनी यू-ट्यूबवर "नंदिनी अँड नील फन शो'च्या माध्यमातून अपलोड केले. 

लॉकडाउनमध्ये कला जोपासली 
लहान मुलांना एकदा झाडांशी ओळख करून दिली की ते त्या झाडांची निगा राखतात. तसेच नियमित पाणी मिळते किंवा नाही याची काळजी घेतात. लॉकडाउनचा वेळ त्यांनी बाग जोपासण्यासाठी केला. 
- डॉ. आशा कुमठेकर, 
जुळे सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT