lokmanya tilak  sakal
सोलापूर

Lokmanya Tilak Punyatithi : लोकमान्य टिळकांचे संघटनात्मक कौशल्य आदर्शवत

आजच्या समाजाला, युवकाला लोकमान्य टिळकांच्या विचाराने प्रेरित होण्याची गरज आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् मी तो मिळविणारच, हे साऱ्या जगाला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांचे सामाजिक कार्य हे आजच्या युवकांसाठी प्रेरणास्थान आहे. सामाजिक उपक्रमातून समाजाला संघटित करण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला.

आजच्या समाजाला, युवकाला लोकमान्य टिळकांच्या विचाराने प्रेरित होण्याची गरज आहे. लोकमान्य टिळकांची सामाजिक चळवळ, संघटनात्मक कौशल्य आदर्शवत वाटत असल्याची भावना लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांनी व्यक्त केल्या.

समाजसुधारक, जहालमतवादी आणि स्वतंत्र भारतासाठी लोकमान्यांचा मोलाचा वाटा होता. निर्भयपणे मत मांडणे, अन्यायाविरोधात पेटून उठणे ही त्यांची आदर्शवत गुण युवकांवर प्रभाव टाकणारे आहेत. आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहेत. स्पर्धेच्या युगात आजचा युवक बधीर अन् मुका झाला आहे. समाजव्यवस्थेला बळकटी येण्याकरिता लोकमान्य टिळकांच्या सामाजिक चळवळीची गरज आज प्रखरतेने जाणवते.

- प्रभाकर हजारे

लोकमान्य टिळकांनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. समाज संघटित करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश आज भरटकलेला दिसतो. डिजिटल युगात वावरणाऱ्या युवकांना खऱ्या गणेशोत्सवाची आठवण करून देण्याची गरज आहे. आजच्या पिढीने लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार करणे, ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरणार आहे.

- गजानन कुलकर्णी

लोकमान्य टिळक यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा हा गुण माझ्यासाठी प्रभावी वाटतो. कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता, परखडपणे मत मांडणे आणि अन्यायाविरुद्ध लढा देणाची त्यांची क्षमता ही समाजाला वेगळी दिशा देणारी आहे.

सर्वच घटकातील लोकांसाठी आपला हक्क मिळविण्यासाठी कायद्याची दारे उघडी नसली तरी अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या व्यक्तींची कमतरता आज आहे. आजच्या समाजाला, युवकाला लोकमान्य टिळकांच्या विचाराने प्रेरित होण्याची गरज आहे.

- गंगाधर नागूरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT