Madhukar Deshmukh Madha taluka chief, said that action should be taken against the officials who were not working on the Tembhurni Mhaswad road 
सोलापूर

टेंभुर्णी-म्हसवड रस्त्याचे काम रखडविणारे अधिकारी व ठेकेदारावर त्वरीत कारवाई करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी-म्हसवड महामार्गाचे काम दोन वर्षांपासून रखडविणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारावर  त्वरीत कारवाई करावी अन्यथा पंधरा दिवसामध्ये शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनामध्ये, टेंभुर्णी-म्हसवड या महामार्गाचे काम गेल्या दोन-तीन वर्षापासून संथगतीने सुरू असून ठेकेदाराने चांगल्या स्थितीतील डांबरी रस्ता ठिक-ठिकाणी उकरून ठेवला आहे. तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदुन ठेवले आहेत. ते खड्डे दोन वर्षांपासून तसेच आहेत. यामुळे वाहन चालकांना खड्डे चुकवित मार्गक्रमण करावे लागत असून या खड्ड्यामुळे वाहनांचे देखील मोठे नुकसान होत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठून राहते. 

अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दोन तास वेळ जात आहे. शेवरे ते संगम दरम्यान सात फूट खोल खड्डा खोदून तो अनेक महिन्यापासून तसाच आहे. यामुळे रस्ता पूर्णपणे बंद आहे. याठिकाणी रस्ता बंद असल्याचा साधा फलक तेथे लावलेला नाही. खड्ड्यात फसलेल्या चारचाकी वाहनास क्रेनद्वारे बाजूला काढावे लागत आहे. टेंभुर्णी-अकलूज रस्त्याने महाराष्ट्र, कर्नाटकमधून दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यात जाणाऱ्या मालवाहू अवजड मालट्रक जात आहेत. यामुळे अवजड वाहतूक करणारी वाहने व कार यांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सध्या ऊस गळीताचा हंगाम सुरू असून या मार्गावरूनअनेक साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणारी शेकडो वाहने दररोज ये-जा करीत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे खड्डयांमुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन वेळ वाया जात आहे. यामुळे वाहन चालक या मार्गावरून ये-जा करण्यास तयार होत नाहीत. परिणामी शेतकऱ्याचे नुकसान होण्याचा धोका आहे.

माढा, करमाळा तालुक्यातून अकलूज येथे दररोज अनेक रुग्ण उपचारास जात आहेत. या खराब रस्त्यामुळे रुग्ण वेळेवर पोहचू शकत नाहीत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे वेळेवर न पोहचल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या गैरसोयीस जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना पाठविल्या आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : जनता सरकारविरोधात बोलणार, गोंदिया मतदारांमध्ये ८० टक्के मतदान काँग्रेसच्या बाजूने... नाना पटोले यांचा दावा

Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाही

Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT