Career In Germany esakal
सोलापूर

शिक्षणात योग्य दिशा ठेवत मधुरिमा नीळ यांचे जर्मनीत करिअर

मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या सोलापूरच्या मधुरिमा नीळ यांनी काही कालावधीतच त्यांच्या जॉब प्रोफाईलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत थेट जर्मनीच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळवली.

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (Mechanical Engineering) शिक्षण पूर्ण केलेल्या सोलापूरच्या मधुरिमा नीळ (Madhurima Neel) यांनी काही कालावधीतच त्यांच्या जॉब प्रोफाईलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत थेट जर्मनीच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळवली. मधुरिमा नीळ यांचे कुटुंब मुळचे सोलापूरचे आहे. मोठी बहिण व भाऊ यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्याने त्यांच्यासमोर ते रोल मॉडेल होते. खरे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मुली फारसे प्राधान्य देत नाहीत. पण नीळ यांच्या कुटुंबात मुले व मुली असा भेदभाव मधुरिमा यांच्या आईवडिलांनी कधीच केला नाही. त्यामुळे त्याची अडचण झाली नाही. त्यांनी शालेय शिक्षण नू.म.वि. व हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये पूर्ण केले. अभियांत्रिकी शिक्षणाची पदविका ए. जी. पाटील महाविद्यालयात पूर्ण केली. विशेष म्हणजे पुणे, मुंबईच्या शिक्षणाचे पर्याय बाजूला ठेवून त्यांनी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. अर्थातच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलींची संख्या कमी असल्याने करिअरच्या संधी मात्र भरपूरच असतात. तेथे विभागप्रमुख प्रा. मेतन यांनी, मेकॅनिकल करिअरमधून आधी जॉबची संधी स्वीकारल्यानंतर (Solapur) पुढील काळात नव्या ध्येयाची वाटचाल करावी असे सूचवले. हा सल्ला मधुरिमा नीळ यांनी स्वीकारला. शेवटच्या वर्षाला एका पूल कॅम्पसमध्ये त्यांची निवड केबीसी कंपनीमध्ये पदवीधर ट्रेनी म्हणून झाली. पुण्यात या कंपनीचे काम सुरु होते. तेथे त्यांनी जॉबला सुरवात केली. त्यांनी कंपनीकडे पुढील शिक्षणासाठी परवानगी मागितल्यावर कंपनीने त्यांना परवानगी दिली.

आठवड्यातील तीन दिवस त्या पिलानीत राहून त्यांनी एम.टेकचे शिक्षण पूर्ण केले. काही दिवस त्यांनी काम केल्यानंतर त्यांची निवड बडोद्याच्या कंपनीकडून करण्यात आली. त्यानंतर त्यांना एक मेल जर्मनीतून मिळाला. त्यामध्ये त्यांना कंपनी सोडण्याच्या ऐवजी केबीसी कंपनीत जर्मनीत काम करता येईल अशी शक्‍यता निर्माण झाली. त्यांनी यासंदर्भात आई-वडिलांशी चर्चा करून त्यांची संमती घेतली. त्यानंतर त्या 2020 च्या सुरवातीला जर्मनीत कंपनीमध्ये रुजू झाल्या. त्यांनी सुरवातीला जर्मन भाषेत काही बेसिक गोष्टी शिकलेल्या होत्या. त्याचा उपयोग त्यांना झाला. नंतर कंपनीने जर्मन भाषेतील शिक्षणाची मूभादेखील दिली.

ठळक बाबी

- मुलींना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मोठी संधी

- शिक्षणानंतर कमी पगारात नोकरी स्वीकारून त्या क्षेत्रातील जॉबचा अभ्यास महत्त्वाचा

- मुलींना मेकॅनिकल इंजिनिअर नोकरीत निवडक वेळेत काम करून कुटुंबासाठी वेळ देणे शक्‍य

- मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन देखील यश मिळवणे शक्‍य

- संगणक, आयटीसारखे सतत बदलत करिअरच्या मागे धावण्याची दमछाक नाही

मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात मुली कमी असल्याने त्या सर्वांमध्ये उठून दिसतात. जॉबमध्ये केवळ आठ तासाचे बंधन असल्याने ते कुटुंबासाठी उपयोगी ठरते. पुण्या-मुंबईच्या शिक्षणाएवढ्याच संधी सोलापुरात आहेत. तसेच आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्‍य होऊ शकले.

- मधुरिमा नीळ, हाले (जर्मनी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway: मध्यनंतर पश्चिम रेल्वे कोकणवासियांसाठी सरसावली! गणेशोत्सवासाठी सोडणार विशेष गाड्या

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

SCROLL FOR NEXT